सनरायजर्स हैदराबादने (SRH) केकेआरचा (KKR) दारूण पराभव केला. केकेआरला ७ विकेटने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ८ विकेट गमावत १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या हैदराबादने ३ विकेट गमावत १७६ धावा केल्या आणि सामना जिंकला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने तुफान फटकेबाजी करत ३७ चेंडूत ७१ धावा केल्या. यात त्याच्या ४ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. एडेन मार्करमने देखील जबरदस्त बॅटिंग करत ३६ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. या दमदार खेळींच्या जोरावर हैदराबादने हा सामना जिंकत कोलकाताला पराभूत केलं. यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस आला.

(सनरायझर्स हैदराबादची शानदार कामगिरी.. गोलंदाजांनी हातातून सामना जात असताना शेवटपर्यंत चांगलं काम केलं. भुवी, उमरान, नटराजन, यानसेन सर्वांनी चांगली कामगिरी केली. फलंदाजीत त्रिपाठीने लक्ष्याचा पाठलाग केला, तर मार्करमने त्रिपाठीला तितकीच चांगली साथ दिली.)

(पॅट कमिंस आता पार्ट टाईम गोलंदाज आणि फलंदाज म्हणून दिसत आहे. कमीत कमी साउदी इकोमोनिकल होते)

(त्रिपाठी आणि मार्करमने खूप चांगली भागिदारी केली. मार्करमसाठी ही खेळी खूप महत्त्वाची होती.)

(वरुण चक्रवर्ती आचा रहस्यमय गोलंदाज राहिलेला नाही.)

(प्रत्येक फिरकीपटू राहुल चहर असत नाही.)

हेही वाचा :

(श्रेयस अय्यर एक सरासरी दर्जाचा कर्णधार आहे.)

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens react on batting of rahul tripathi in ipl 2022 srh vs kkr match pbs