Virat Kohli vs Gautam Gambhir Viral Video : आयपीएल २०२३ चा ४३ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. इकाना स्टेडियममध्ये सामना अटीतटीचा झाल्याने अधिक रंगतदार झाला. बंगळुरुने लखनऊचा १८ धावांनी पराभव केला. परंतु, सामना संपल्यानंतर एक वेगळाच रोमांच पाहायला मिळाला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भर मैदानात शाब्दीक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. नवीन उल हक, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या भांडणाचे अनेक व्हिडीओ समोर आले. पण आता सोशल मीडियावर एक नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यामध्ये विराट कोहली सर्व खेळाडूंना हस्तांदोलन करताना दिसत आहे. त्याचदरम्यान नेमकं काय घडलं? कोणत्या कारणामुळं या वादाला तोंड फुटलं? ते या व्हायरल व्हिडीओत एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात हस्तांदोलन करत असताना बाचाबाची झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर इतर खेळाडू मध्यस्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सर्व खेळाडूंनी हात मिळवल्यानंतर विराट कोहली पुढे जातो आणि चाहत्यांना जल्लोश आणखी वाढतो. त्यानंतर विराटशी चर्चा करत असलेल्या मेयर्सला गौतम गंभीर बाजूला घेऊन जातो. पण त्यावेळी विराट कोहली गंभीरला कायतरी म्हणतो आणि गंभीरही त्याला प्रत्युत्तर देत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – Video: विराट कोहलीचा राग शांत करण्याचा प्रयत्न केलाय का? रवी शास्त्री म्हणाले, “तो स्वभाव…”

इथे पाहा व्हिडीओ

दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटल्यानंतर इतर खेळाडू त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. गंभीरला उत्तर दिल्यानंतर विराट कोहली पुढे निघून जातो. त्याचवेळी नवीन उल हक मागच्या दिशेनं येतो आणि विराटला डीवचण्याचा प्रयत्न करत करतो. त्यानंतर विराटही त्यावर रिअॅक्ट होतो. फाफ डु प्लेसिस विराटला शांत करण्याचा प्रयत्न करतो. कोणत्या कारणांमुळं मैदानात या भांडणाला सुरुवात झाली, हे या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.