मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्ज संघाला अवघ्या ७९ धावांत गारद करून टाकले आणि वानखेडेवरचे आम्हीच सुपरकिंग्ज असल्याचे मुंबईने सिद्ध केले आहे. मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी जरी धीम्या गतीने झाली होती आणि चेन्नईसारख्या बलाढ्य संघासमोर केवळ १४० धावांचे लक्ष्य अगदी कमी असले तरी, मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीकरत चेन्नई सुपरकिंग्जचा निम्मा संघ अवघ्या ३० धावांच्या आतच तंबूत परत धाडला. पोलर्डने हसीचे तीन झेल सोडले. परंतु रैनाचा झेल उत्तमरित्या झेलला. त्यापाठोपाठ बद्रिनाथलाही मिचेल जॉन्सनने बाद केले.  हरभजनने आर.अश्विनला त्रिफळा बाद केले. चेन्नरई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, प्रग्यान ओझाच्या गोलंदाजीवर धोनी झेल बाद झाला आणि चेन्नई संघाच्या विजयाच्या आशा लोप पावल्या. रवींद्र जडेजाने धावसंख्या सावरण्याचा प्रयत्न सुरु केला होता पण तोपर्यंत संघाचे नऊ गडी बाद झाले होते. सरतेशेवटी जडेजाही झेलबाद झाला आणि मुंबईने ६० धावांच्या फरकाने सामना जिंकला. संपुर्ण आयपीएल सामन्यांतील चेन्नईची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. संपुर्ण संघ फक्त ७९ धावांवर बाद झाला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सचिन आणि स्मिथने चांगली फलंदाजीकरत सामन्याची उत्तम सुरुवात केली. सचिनच्या बॅटला गवसलेला एक षटकार वानखेडेवर जमलेल्या प्रेक्षकांना पहावयास मिळाला आणि आज सचिनची बॅट तळपणार अशी खात्री होताच. सचिन तंबूत परतला. त्यापाठोपाठ स्मिथचाही चेन्नईने गाशा गुंडाळला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरतो की काय? असे चित्र उभे राहू लागले. पोलार्डलाही अगदी स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर दिनेश कार्तिकने सामना सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु सामन्याच्या तेराव्या षटकात दिनेशही बाद झाला. तेव्हा मुंबई इंडियन्सची धावसंख्या ४ बाद ७५ अशी होती.
मुंबईचा हरपरमौला खेळाडू हरभजन सिंगने मैदानावर आल्या आल्याच पहिल्या चेंडूवर षटकार मारत संघावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याचे दाखवले आणि संघाच्या धावसंख्या सावरण्यास सुरूवात केली. रोहित शर्मा आणि हरभजनने शेवटच्या पाच षटकात धडाकेबाज फलंदाजी करत वीस षटकांच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येला १३९ पर्यंत पोहोचवले होते.