Nicholas Pooran- Marcus Stoinis Smashes 5 sixes in A Over : निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉयनिसने अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर ६ चेंडूत ५ षटकार ठोकून सामना लखनऊच्या बाजूनं फिरवला. आयपीएलच्या ५८ व्या सामन्यात लखनऊच्या इनिंगमध्ये १६ व्या षटकात धावांचा पाऊस पडला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून लखनऊसमोर विजयासाठी १८३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना लखनऊने १५ षटकात २ विकेट गमावत ११४ धावा केल्या होत्या. त्यामुळे विजयासाठी लखनऊला ३० चेंडूत ६८ धावांची आवश्यकता होती. प्रेरक मंकड आणि मार्कस स्टॉयनिस खेळपट्टीवर असताना कर्णधार मार्करमने अभिषेक शर्माला १६ व्या षटकाची जबाबदारी दिली. त्यानंतर स्टॉयनिस आणि पूरनने धमाका केला.
१६ व्या षटकात सामना लखनऊच्या बाजूनं फिरला
हैदराबाद विजयासाठी ३० चेंडूत ६८ धावांची आवश्यकता होती. स्टॉयनिस आणि प्रेरक मंकडला आक्रमक फलंदाजी करायची होती. त्यावेळी कर्णधार मार्करमने अभिषेक शर्माला १६ व्या षटकाची जबाबदारी दिली अन् लखनऊने शर्मचा धुव्वा उडवत या षटकात ३१ धावा कुटल्या. स्टॉयनिसने २ तर निकोलस पूरनने तीन षटकार ठोकून सामन्याची रंगत वाढवली.
इथे पाहा व्हिडीओ
पहिला चेंडू – षटकार
पहिल्या चेंडूवर मार्कस स्टॉयनिसने षटकार ठोकला. पहिल्याच चेंडूवर षटकार गेल्याने अभिषेक शर्मावर दबाव आला.
दुसरा चेंडू – वाईड
या षटकातील दुसरा चेंडू अभिषेक शर्माने वाईड फेकला. त्यामुळे एका चेंडूवर लखनऊला सात धावा मिळाल्या होत्या.
दुसरा चेंडू – षटकार
या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरही स्टॉयनिसने षटकार ठोकून सामन्याचा रोमांच वाढवला. त्यामुळे दोन चेंडूवर लखनऊला १३ धावा मिळाल्या होत्या.
तिसरा चेंडू – स्टॉयनिस बाद
तिसऱ्या चेंडूवर अभिषेकने वापसी केली आणि स्टॉयनिसला झेलबाद केला. स्टॉयनिसने २५ चेंडूत ४० धावांची खेळी साकारली. या इनिंगमध्ये मार्कसने ३ षटकार आणि २ चौकार ठोकले. स्टॉयनिस बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी निकोलस पूरन मैदानात उतरला.
चौथा चेंडू – षटकार
मैदानात फलंदाजीसाठी उतरताच निकोलस पूरनने त्याच्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. सुरुवातीलाच पूरनच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज पाहून गोलंदाज शर्माही थक्क झाला. पूरनने हा षटकार ठोकून त्याच्या इनिंगची शानदार सुरुवात केली.
पाचवा चेंडू – षटकार
पूरनने पुन्हा एकदा कमाल करत शर्माच्या पाचव्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला. त्यानंतर हैद्राबादच्या खेळाडूंवर मोठा दबाव आला होता.
सहावा चेंडू – षटकार
अभिषेक शर्माच्या या चेंडूवरही पूरनने षटकार ठोकून राजीव गांधी स्टेडियममध्ये धमाका केला. पूरनने शर्माच्या गोलंदाजीवर षटकार हॅट्रिक मारली. शर्माच्या गोलंदाजीवर एकूण पाच षटकार आणि एक वाईड गेल्याने लखनऊला ३१ धावा मिळाल्या.