Nitish Rana reveals about Rinku Singh’s Bat: ९ एप्रिलला अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रिंकू सिंगने एक मोठा पराक्रम केला. त्याने शेवटच्या षटकात ५ षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिला. त्यामुळे रिंकू सिंगचे नाव आयपीएल इतिहासाच्या पानात नोंदवले गेले आहे. शेवटच्या षटकात केकेआरला सामना जिंकण्यासाठी २९ धावांची गरज होती. तेव्हा स्ट्राइकवर असलेल्या रिंकू सिंगने गुजरात जायंट्सचा गोलंदाज यश दयालला सलग ५ षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंगने ज्या बॅटने सलग ५ षटकार मारले त्याची कहाणी वेगळी आहे. ही कहानी केकेआरचा कर्णधार नितीश राणाने शेअर केली आहे.

नितीश राणाच्या बॅटने रिंकूने लगावले पाच षटकार –

खरे तर रिंकू सिंगने सामन्याच्या शेवटच्या षटकात, ज्या बॅटने सलग पाच षटकार मारले, ती बॅट नितीश राणाची होती. ९ एप्रिल रोजी नितीश राणा यांनी त्यांची बॅट बदलली. यापूर्वी नितीशने गेल्या आयपीएल हंगामात या बॅटने काही सामने खेळले होते. या वर्षी, देशांतर्गत क्रिकेट व्यतिरिक्त, त्याने या बॅटने आयपीएल २०२३ मध्ये २ सामने खेळले होते. मात्र ९ एप्रिल रोजी त्याने बॅट बदलली.

Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

केकेआरचा कर्णधार नितीश राणाने सामन्यानंतर सांगितले की, ‘रिंकूने मला ही बॅट मागितली होती. मला द्यायची नव्हती. पण कुणीतरी आतून ती बॅट बाहेर आणली. मला असे वाटले होते की, रिंकू हीच बॅट घेईल. कारण त्यात पिक-अप चांगला आहे. त्याचे वजनही कमी आहे. आता ती रिंकूची बॅट आहे.”

गुजरातने कोलकाताला २०५ धावांचे लक्ष्य दिले होते –

हेही वाचा – IPL 2023: रिंकू सिंग एका षटकांत पाच षटकार मारत ‘या’ तीन खेळाडूंच्या क्लबमध्ये झाला सामील, जाणून घ्या कोण आहेत?

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून २०४ धावा केल्या. २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने १५५ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. एकवेळ केकेआरची धावसंख्या ४ गडी बाद १५५ अशी होती. मात्र राशिद खानने हॅट्ट्रिक घेत केकेआरला बॅकफूटवर ढकलले होते. अशा स्थितीत फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंगने २१ चेंडूत ४८ धावांची तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने एका चौकारासह ६ षटकार मारले. आयपीएल २०२३ मध्ये केकेआरचा हा सलग दुसरा विजय ठरला.