Nitish Reddy lost 10 thousand rupees bet against Abdul Samad : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४१वा सामना हैदराबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत केवळ दोनच सामने गमावले असून तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आरसीबीविरुद्ध विजय मिळवून संघ अव्वल ४ मध्ये आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सामन्यापूर्वी हैदराबादचा खेळाडू नितीश रेड्डीला १०,००० रुपयांचा फटका बसला, ज्याचा व्हिडीओ सनरायझर्स हैदराबाद संघाने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सनरायझर्स हैदराबादने एक्सवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये संघाचे खेळाडू सराव करताना दिसत आहेत. यावेळी नितीश रेड्डी आणि अब्दुल समद यांच्यात पैज लावण्यात आली. नितीश म्हणाला, मी अब्दुलपेक्षाही उंच झेप घेऊ शकतो. त्याचबरोबर तो म्हणाला, जर अब्दुलने त्याच्यापेक्षा उंच उडी मारली तर तो त्याला १०,००० रुपये देईल. यानंतर अब्दुल समद नितीश रेड्डीला म्हणाला, तो पाच वर्षे व्हॉलीबॉल खेळला आहे. ही पैज तो जिंकला तर तो रेड्डींची बॅट घेईल. मात्र, रेड्डीने असे करण्यास नकार दिला.

नितीश रेड्डी हरला पैज –

यानंतर दोघांमध्ये १० हजार रुपयांची पैज लागली आणि स्पर्धा सुरू झाली. नितीश रेड्डी पहिल्यांदा हरला आणि त्यानंतर असे तीनदा करायचे ठरले. शेवटी पुन्हा एकदा अब्दुल समद हाच विजयी ठरला. त्यानंतर अब्दुल समद नितीश रेड्डीला म्हणाला आता १०,००० रुपये दे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – त्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही: हरभजनच्या ‘सॅमसनला पुढचा टी-२० कर्णधार बनवायला हवा’ या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

नितीश रेड्डीच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद –

सनरायझर्स हैदराबाद संघाने ९ एप्रिल रोजी पंजाब किंग्जचा पराभव केला होता. या सामन्यात नितीशने फलंदाजी करताना ६४ धावांची खेळी केली. या सामन्यात त्याने एक विकेटही घेतली. त्याचबरोबर नितीशने क्षेत्ररक्षणातही एक झेल घेतला. यासह नितीश कोणत्याही आयपीएल सामन्यात एकाच वेळी हे तीन पराक्रम करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish reddy lost 10 thousand rupees bet against abdul samad sunrisers hyderabad shared video vbm