हरभजन सिंग व एस. श्रीशांत यांच्यात मैदानावर पुन्हा एकदा पंगा होईल, या भीतीने श्रीशांतला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात वगळण्यात आले, या चर्चेला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडने पूर्णविराम दिला. खेळाडूंवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी संघ व्यवस्थापनाने हे पाऊल उचलले, असे द्रविडने स्पष्ट केले.  तो म्हणाला, ‘‘श्रीशांतच्या वगळण्यामागे ‘थप्पड’ प्रकरणाचा कोणताही संबंध नाही. श्रीशांतने चार सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे. अद्याप आयपीएल स्पर्धेला ४०पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे त्याची तंदुरुस्ती हाच त्याबाबतचा उद्देश होता.’’ २००८मध्ये घडलेले ‘थप्पड’ प्रकरण हे पूर्वनियोजित होते. हरभजन हा दगाबाज आहे, असे सांगत श्रीशांतने हे प्रकरण उकरून काढले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No slap matter behind exclusion of shrishant dravid