यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वोत्तम चार संघांबरोबर लाचलुचपत प्रतिबंध आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी पाठवण्यात आले आहेत. रविवारी बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ रविवारी पहिल्या ‘प्ले-ऑफ’साठी येथे पोहोचले असून सोमवारपासून त्यांच्याबरोबर प्रत्येकी एक अधिकारी असेल, तर दुसऱ्या ‘प्ले-ऑफ’साठी राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ मंगळवारी येथे पोहोचणार असून त्यांच्याबरोबरही प्रत्येकी एक अधिकारी असेल.

Story img Loader