Parthiv Patel Reveals About Dhoni: एमएस धोनी ३ एप्रिल २०२३ रोजी चार वर्षांनंतर त्याच्या घरच्या मैदानावर (चेपॉक स्टेडियम) खेळायला उतरला आहे. त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टेडियम पुन्हा एकदा सजले आहे. चेपॉक स्टेडियमवर लखनऊ आणि चेन्नई संघात खेळला जात आहे. या सामन्यात एलएसजीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी माजी खेळाडू पार्थिव पटेलने धोनीबद्दल खुलासा केला होता, त्याने सांगितले की, धोनीला पहिल्यांदाच भावुक होताना पाहिले.

सामन्यापूर्वी जिओ सिनेमावर लाईव्ह कॉमेंट्री करताना पार्थिव पटेलने धोनीसोबतचा आयपीएलमदील एक किस्सा सांगितला. त्याने सांगितले की, आयपीएल २०१० मध्ये धर्मशाला येथे एक सामना खेळला गेला होता, जेव्हा धोनी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा तो खूप भावुक झाला होता. मी त्याला याआधी कधीच भावुक झालेले पाहिले नव्हते, अगदी वर्ल्ड कपमध्येही नाही आणि आयपीएलच्या कोणत्याही सीझनमध्येही नाही.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…

ज्या मॅचबद्दल पार्थिव पटेल बोलत होता. त्या सामन्यात धोनी ओपनिंग करण्यासाठी आला होता. एमएस धोनीने २९ चेंडूत ५४ धावा केल्या, या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार लगावले होते. तसेच सामनावीरचा पुरस्कारही एमएस धोनीला देण्यात आला होता. त्याच वर्षी (२०१०) चेन्नई सुपर किंग्जने प्रथमच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. तेव्हापासून धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा चॅम्पियन बनले आहे.

हेही वाचा – IPL 2023: वीरेंद्र सेहवागचे ऋतुराज गायकवाडबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘मला आश्चर्य वाटते की त्याला….’

आजच्या सामन्याबद्दल बोलायचे, पावरप्लेच्या समाप्तीनंतर सीएसके संघाने बिनबाद ७९ धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड ४६ आणि डेव्हॉन कॉनवे २३ धावांवर खेळत आहेत. आतापर्यंत ऋतुराज गायकवाडने आपल्या खेळीत २ चौकार आणि ४ षटकार लगावले आहेत. त्याचबरोबर डेव्हॉनही ४ चौकार लगावले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

लखनऊ सुपर जायंट्स: केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृष्णप्पा गौतम, मार्क वुड, रवी बिश्नोई, यश ठाकूर, आवेश खान.

हेही वाचा – Jos Buttler & Yuzvendra Chahal: ‘…म्हणून आवडता शॉट खेळलो नाही’; चहलच्या प्रश्नाला उत्तर देताना बटलरचा खुलासा, पाहा VIDEO

चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर) शिवम दुबे, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगेरगेकर.

दोन्ही संघातील सब्सीट्यूट खेळाडू –

लखनऊ सुपर जायंट्स: आयुष बडोनी, जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, अमित मिश्रा.
चेन्नई सुपर किंग्ज : तुषार देशपांडे, ड्वेन प्रिटोरियस, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, अजिंक्य रहाणे.

Story img Loader