CSK CEO Kasi Vishwanath with Shashank Singh Video : आयपीएल २०२४ मध्ये पंजाबची कामगिरी काही विशेष झाली नाही. संघाचा कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. शिखरच्या अनुपस्थितीत सॅम करन पंजाबचे नेतृत्व करत आहे. पंजाबची फलंदाजीही कमकुवत झाली आहे पण संघाकडे एक असा खेळाडू आहे. जो प्रत्येक सामन्यात संघाला अडचणीतून बाहेर काढत आहे. तो म्हणजे शशांक सिंग. जो यंदाच्या हंगामात कमी सामन्यात आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला आहे. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता शशांकचा सीएसकेच्या सीईओबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, तो २०२५ मध्ये सीएसकेत जाणार, अशी अटकळ बांधली जात आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शशांक सिंग सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथ यांच्यासोबत दिसत आहे. क्लिपमध्ये सीएसकेचे सीईओ शशांकला मिठी मारून त्याच्याशी बोलत आहे. यानंतर वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. सीएसकेला शशांक सिंगमध्ये रस असल्याचे मानले जात आहे. हे देखील शक्य आहे की जर पंजाबने आयपीएल २०२४ मध्ये शशांक सिंगला कायम ठेवले नाही, तर सीएसके आयपीएल २०२५ च्या महा लिलावात शशांक सिंगला खरेदी करू शकते.

Bharti Singh
Video : शाहरुख खानचं ‘ते’ कृत्य पाहून भारती सिंगला अश्रू झाले अनावर; किस्सा सांगत म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
hema malini laughed at ramdev baba
Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना
Mohammad Amir pulled off the Pushpa celebration during the ILT20 tournament in Dubai video viral
Mohammad Amir : पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचं विकेट घेतल्यानंतर ‘पुष्पा’ स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल
Bigg Boss Marathi Season 5 Fame Abhijeet Sawant Reel Video With Wife And Daughters
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा पत्नी अन् मुलींबरोबर सुंदर Reel व्हिडीओ; योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर म्हणाली…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: पुष्पा काकीच्या ‘त्या’ कृतीमुळे तुळजासमोर सत्य येणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा
Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab shramesh betkar reels video viral
Video: “चेहरा क्या देखते हो…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब-श्रमेश बेटकरचा ‘हा’ Reel व्हिडीओ पाहिलात का? एक्सप्रेशन्सने वेधलं लक्ष
Kushal Badrike
“आनंदाची बातमी…”, श्रेया बुगडेबरोबरचा व्हिडीओ शेअर करीत कुशल बद्रिके म्हणाला, “आगे पूरी बारात…”

आयपीएल २०२४ मधील शंशाक सिंगची कामगिरी –

सध्या, शशांक सिंग आयपीएल २०२४ मध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यातून जात आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या शशांक सिंगने ६ सामन्यात ७२ च्या सरासरीने २८८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २ अर्धशतकांचाही समावेश आहे. या हंगामात शशांक सिंग पंजाबसाठी संकटमोचकची भूमिका पार पडत आहे. याआधी शशांक सिंग सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीचा भाग होता. मात्र हैदराबादमध्ये त्याला फारशा संधी मिळाल्या नाहीत.

हेही वाचा – SRH vs RR : भुवनेश्वरने हैदराबादला विजय मिळवून देताच काव्या मारनचे खास रोनाल्डो स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO व्हायरल

पंजाबची किंग्जची आयपीएलमधील कामगिरी –

गेल्या काही हंगामांप्रमाणे यंदाही पंजाबचा हा हंगाम फारसा खास राहिला नाही. संघात स्टार खेळाडू कमी आहेत. त्याचबरोबर संघाचा कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे पंजाबच्या फलंदाजांनाही धावा करण्यात अपयश येत आहे. बहुतांश सामन्यांमध्ये पंजाबची धावगती खूपच कमी राहिली आहे. पण गेल्या दोन सामन्यांत पंजाबने कमाल केली. पंजाबने २६ एप्रिल रोजी कोलकाताविरुद्ध खेळल्या गेलेल्या हाय स्कोअरिंग सामन्यात कोलकाताचा ८ गडी राखून पराभव करून या मोसमातील सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्याचा विक्रम केला.

हेही वाचा – वनडे आणि ट्वेन्टी२० प्रकारात टीम इंडिया अव्वल; आयसीसीची वार्षिक क्रमवारी जाहीर

केकेआरच्या २६१ धावांच्या प्रत्युत्तरात पंजाबने १८.४ षटकांत २ बाद २६२ धावा करत सामना जिंकला. यानंतर १ मे रोजी झालेल्या सामन्यात पंजाबने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पंजाबने हा सामना ७ विकेटने जिंकला. ज्यामध्ये शशांक सिंगने नाबाद २५ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

Story img Loader