आयपीएल २०२३मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर दिल्लीचा संघ इतर संघांचा खेळ खराब करत आहे. या मोसमातील ६४व्या सामन्यात दिल्लीने पंजाब किंग्जचा १५ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे पंजाबसाठी प्लेऑफची शर्यत कठीण झाली आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २ बाद २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ आठ गडी गमावून केवळ १९८ धावा करू शकला आणि सामना गमावला.
हिमाचल प्रदेशातील धरमशाला क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या कालच्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १५ धावांनी रोमांचक विजय मिळवला आणि त्यांना आयपीएल २०२३ मधून बाहेर केले, परंतु दिल्ली कॅपिटल्सने अतिशय खराब क्षेत्ररक्षण केले. कुलदीप यादव खूप दुर्दैवी ठरला कारण त्याच्या गोलंदाजीवर अनेक झेल सुटले. असाच एक झेल अथर्व तायडेचा होता तो यश धुलने सोडला, ज्यानंतर केवळ कुलदीप यादवच नाही तर दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंगही खूप संतापला होता. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यश धुलने झेल सोडला आणि रिकी पॉंटिंग भडकला
पंजाबच्या डावातील १०वे षटक कुलदीप यादव करत होता, लियाम लिव्हिंगस्टन आणि अथर्व तायडे खेळपट्टीवरवर फलंदाजी करत होते. १०व्या षटकातील चौथा चेंडू अथर्व तायडेने लाँग ऑनच्या दिशेने खेळला, जो थेट १९ वर्षीय यश धुलच्या हातात गेला. धुलला हा सोपा झेल टिपता आला नाही यामागील कारण त्याने मैदानातील लाईट्स सांगितले. धुलने झेल सोडल्यानंतर कुलदीप यादवसह दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग दोन्हीही भडकले कारण, सामन्यात पारडे कधी पंजाबच्या बाजूने तर कधी दिल्लीच्या बाजूने झुकत होते. अशा वेळी ‘कॅचेस विन मॅचेस’ ही इंग्रजी अगदी चपखल लागू पडते.
अर्थव तायडेचा झेल पडला महागात
अथर्व तायडेने यश धुलच्या सोडलेल्या झेलचा फायदा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. अथर्व तायडेने ४२ चेंडूत ५५ धावांची खेळी केली, ज्यात त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. अथर्वची ही खेळी पंजाबसाठी कामी आली नाही आणि संघाला १५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तत्पूर्वी, आठव्या षटकात कुलदीप यादवने लियाम लिव्हिंगस्टोनला गोलंदाजी करता असताना ऑनरिक नॉर्खियाने पहिला झेल सोडला. त्यानंतर त्याने स्टेडियमच्या बाहेर षटकार मारला. या मिळालेल्या संधीचा फायदा उठवत गमावली त्याने तायडेसोबत ७८ धावांची भागीदारी केली. लियामचा पुन्हा एक शॉट मिड-विकेट क्षेत्ररक्षकाकडे म्हणजेच नॉर्खियाकडे जातो आणि तो पुन्हा तो झेल सोडतो. त्यानंतर यश धुलच्या हातून तिसरा झेल सुटतो. त्यात दिल्लीच्या संघाने दोन रनआउटची संधी चुकवली. यामुळे कुलदीप आणि रिकी पाँटिंग दोघेही नाराज झाले.