Punjab Kings vs Gujarat Titans IPL Score Updates: आयपीएल २०२३ मध्ये गुरुवारी (१३ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना खेळला जात आहे. मोहाली येथे सुरु असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्ससमोर १५४ धावांचे आव्हान ठेवले आहे. गुजरातच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत फलंदाजांना बांधून ठेवले. मागील सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.

या सामन्यासाठी गुजरात संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याला संधी दिली गेली. तब्बल तीन वर्षाच्या कालावधीनंतर तो आयपीएल खेळताना दिसला. कर्णधार हार्दिक पांड्या पुनरागमन करत असल्याने विजय शंकर याला बाहेर बसावे लागले. तर, युवा यश दयालच्या जागी अनुभवी मोहित शर्मा याला संधी मिळाली. एकेकाळी भारतीय संघाचा तसेच आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला मोहित मागील तीन वर्षापासून आयपीएलमध्ये सहभागी झाला नव्हता.या पुनरागमनाच्या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीची जुनी धार दाखवली. आपल्या ४ षटकात त्याने केवळ १८ धावा देत २ बळी मिळवले.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावला असून या सामन्यात त्यांना विजयी मार्गावर परतायचे आहे. हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत पहिल्या चार संघांमध्ये पोहोचेल. कर्णधार हार्दिक पांड्या मागच्या सामन्यात खेळला नव्हता. पण आज त्याने शानदार पुनरागमन केले तसेच, मोहित शर्मा गुजरातकडून पदार्पण करत आहे. पंजाबची सुरुवात खराब झाली डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर प्रभसिमरन सिंग मोहम्मद शमीकरवी बाद केले. त्यानंतर फॉर्ममध्ये असणारा कर्णधार शिखर धवन आज काही कमाल करू शकला नाही त्याने केवळ ८ धाव केल्या, जोशुआ लिटलने त्याला माघारी पाठवले. पॉवर प्लेमध्ये पंजाबने ६ षटकांत २ बाद ५२ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट मात्र जबरदस्त फटकेबाजी करताना दिसला. भानुका राजपक्षाने दुखापतीतून सावरून आज पुनरागमन केलं.

सातव्या षटकात राशिद खान गोलंदाजीला आला अन् त्याने गुजरातला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. २४ चेंडूंत ३६ धावा करणारा शॉर्ट गुगलीवर त्रिफळाचीत झाला. राजपक्षा आणि जितेश शर्मा यांनी पंजाबचा डाव सावरला होता. पण, गुजरातकडून पदार्पण करणाऱ्या मोहितने ही जोडी तोडली. जितेश शर्मा २३ चेंडूंत २५ धावांवर बाद झाला.

हेही वाचा: IPL 2023: …अजिबात खपवून घेतले जाणार नाही! अ‍ॅश अण्णाला अंपायर्सशी पंगा घेणं पडलं महागात, BCCIची कडक कारवाई

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्ससमोर १५४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्यांच्याशिवाय मधल्या फळीतील फलंदाजांनीही उपयुक्त योगदान दिले. गुजरातकडून मोहित शर्माने दोन बळी घेतले. त्याचवेळी इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. यजमानांना त्यांच्याच घरात फलंदाजीला आमंत्रित करत गुजरातने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

Story img Loader