IPL 2025, KKR VS PBKS Highlights: पंजाब किंग्स संघाने आयपीएल इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करत केकेआर संघावर चित्तथरारक विजय मिळवला. पंजाबने केकेआरला विजयासाठी ११२ धावांचे लक्ष्य दिले होते, पण केकेआरचा संघ १५.१ षटकांत ९५ धावा करत सर्वबाद झाला. पंजाबच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. तर युझवेंद्र चहल ४ विकेट्स घेत संघाच्या विजयाचा हिरो ठरला.
IPL 2025 Punjab Kings vs Kolkata Knight Riders Highlights: आयपीएल २०२५ पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याचे हायलाईट्स
PBKS vs KKR Live: पंजाबचा ऐतिहासिक विजय
PBKS vs KKR Live: आंद्रे रसेलने एका षटकात कुटल्या १७ धावा
आंद्रे रसेलने चहलच्या अखेरच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार लगावत १६ धावा केल्या. यासह रसेलने पुन्हा एकदा सामन्याचा रोख बदलला.
मार्काे यान्सनच्या १३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हर्षित राणा क्लीन बोल्ड झाला. यासह केकेआरने १३ षटकांत ८ बाद ७९ धावा केल्या आहेत. तर आता केकेआरला विजयासाठी ४३ चेंडूत ३३ धावांची गरज आहे.
PBKS vs KKR Live: चहलच्या फिरकीची जादू
युझवेंद्र चहलने १२व्या षटकात दोन चेंडूवर दोन विकेट घेत पंजाब किंग्सने सामन्यात स्वतला कायम ठेवलं आहे. चहलच्या षटकात रिंकू सिंग स्टम्पिंगवर बाद झाला तर रमणदीप सिंग पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला.
मॅक्सवेलच्या ११व्या षटकातील चौथ्या चेंडूवर वेंकटेश अय्यर पायचीत झाला. केकेआरने रिव्ह्यू घेतला पण तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र पंजाबच्या खात्यात गेला आणि संघाला महत्त्वाची विकेट मिळाली. यासह केकेआरचा निम्मा संघ ११ षटकांत ७४ धावा करत माघारी परतला आहे.
PBKS vs KKR Live: चहलच्या खात्यात अजून एक विकेट
युझवेंद्र चहलने १०वी विकेट मेडन ओव्हर टाकली. या षटकात त्याने अंगक्रिश रघुवंशीला पहिल्याच चेंडूवर झेलबाद केलं. त्यानंतर एकही धाव काढण्याची संधी स्ट्राईकवर असलेल्या गोलंदाजाला दिली नाही.
PBKS vs KKR Live: तिसरी विकेट
युझवेंद्र चहलच्या आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणे पायचीत झाला. यासह पंजाबला तिसरी विकेट मिळाली. केकेआरला विजयासाठी आता ७२ चेंडू ४४ धावांची गरज आहे.
मार्को यान्सनच्या पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सुनील नरेन क्लीन बोल्ड झाला. तर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डिकॉक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह सामन्याच्या सुरूवातीलाच पंजाबने दोन विकेट्स मिळवले आहेत. यासह केकेआरने २ षटकांत २ बाद १२ धावा केल्या आहेत.
१६व्या षटकातील वैभव अरोराच्या पहिल्याच चेंडूवर शशांक सिंग पायचीत झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकात चुकीच्या कॉलवर बार्टलेट धावबाद झाला. यासह पंजाब किंग्सचा संघ अवघ्या १५.३ षटकांत १११ धावांवर सर्वबाद झाला. पंजाबचे सलामीवीर प्रियांश आर्य २२ धावा तर प्रभसिमरन सिंग ३० धावा करत बाद झाले. यानंतर सर्व फलंदाज फेल ठरले. पंजाबच्या खराब फलंदाजीचा संघाला फटका बसला.
PBKS vs KKR Live: पुन्हा एका षटकात २ विकेट
सुनील नरेनच्या ११व्या षटकात पहिल्या आणि अखेरच्या चेंडूवर विकेट घेत पंजाबने ८ विकेट्स गमावल्या आहेत. सूर्यांश शेडगे पुन्हा एकदा अपयशी ठरला, तर अखेरच्या चेंडूवर यान्सन झेलबाद झाला.
PBKS vs KKR Live: पुन्हा २ षटकात पंजाबला २ धक्के
एनरिक नॉर्कियाच्या नवव्या षटकातील चौथ्या षटकात झेलबाद झाला. तर १०व्या षटकातील वरूण चक्रवर्तीच्या पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेल क्लीन बोल्ड झाला. यासह पंजाबने १० षटकांत ५ विकेट्स गमावले आहेत आणि फक्त ८० धावा केल्या आहेत.
PBKS vs KKR Live: प्रभसिमरन सिंग झेलबाद
पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात प्रभसिमरन सिंगने २ षटकार लगावत संघाची धावसंख्या वाढवली. पण अखेरच्या चेंडूवर मोठा फटका लगावत तो झेलबाद झाला. रमणदीपने पुन्हा एकदा एक कमालीचा झेल टिपला. यासह पंजाबने पॉवरप्लेमध्ये ४ बाद ५४ धावा केल्या आहेत.
PBKS vs KKR Live: इंग्लिस क्लीन बोल्ड
वरूण चक्रवर्तीच्या ५व्या षटकात जोश इंग्लिस फलंदाजीला आला आणि पाचव्या चेंडूवर क्लीन बोल्ड होत माघारी परतला. यासह पंजाबने ३ विकेट्स गमावले आहेत. यासह पंजाबने ५ षटकांत ३ बाद ४२ धावा केल्या आहेत.
PBKS vs KKR Live: एका षटकात दोन विकेट
वादळी सुरूवातीनंतर प्रियांश आर्यने हर्षित राणाच्या चौथ्या षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. तर चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यर झेलबाद झाला. दोन्ही झेल रमणदीपने कमालीचे टिपले. यासह पंजाबने ४ षटकांत २ बाद ३९ धावा केल्या आहेत.
PBKS vs KKR Live: तिसऱ्या षटकात २० धावा
प्रभसिमरन सिंगने वैभव अरोराच्या तिसऱ्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर दोन चौकार आणि एक षटकार लगावला. तर प्रियांशने एक चौकार लगावत २० धावा केल्या. यासह पंजाबने ३ षटकांत बिनबाद ३३ धावा केल्या आहेत.
PBKS vs KKR Live: पंजाब-केकेआर सामन्याला सुरूवात
पंजाबच्या वादळी फटकेबाजी करणाऱ्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. पंजाबने पहिल्या २ षटकात बिनबाद १३ धावा केल्या आहेत.
PBKS vs KKR Live: श्रेयस अय्यरला आयसीसीने दिला हा पुरस्कार
PBKS vs KKR Live: केकेआरची प्लेईंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वैभव अरोरा, एनरिक नॉर्किया, वरूण चक्रवर्ती
पंजाब किंग्सकडून दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये जोश इंग्लिस आणि जेवियर बार्टलेट या खेळाडूंचा समावेश आहे.
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (डब्ल्यू), श्रेयस अय्यर (क), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
PBKS vs KKR Live: पंजाब किंग्सची प्लेईंग इलेव्हन
प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (डब्ल्यू), श्रेयस अय्यर (क), नेहल वढेरा, जोश इंग्लिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्को जॅनसेन, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल
पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याची नाणेफेक झाली असून पंजाब संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. तर केकेआरच्या ताफ्यात मोईन अलीच्या जागी एनरिक नॉर्कियाला संघात संधी देण्यात आली आहे.
PBKS vs KKR Live: श्रेयस अय्यर वि. केकेआर
पंजाब किंग्स वि. केकेआर या संघांमधील लढत अटीतटीची होणार आहे. श्रेयस अय्यर गेल्यावर्षी केकेआर संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली केकेआरने आयपीएल २०२३चे जेतेपद पटकावले होते. पण यानंतर आयपीएल २०२५ लिलावापूर्वी केकेआरने त्याला रिलीज केले. त्यामुळे केकेआर संघातील बऱ्याचशा खेळाडूंची त्याला माहिती आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
PBKS vs KKR Live: kkr विरूद्ध सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का
कोलकाताविरूद्ध सामन्यापूर्वी पंजाब किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्त्वाचा खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
लॉकी फर्ग्युसन स्पर्धेबाहेर गेल्याने पंजाबची गोलंदाजी कमकुवत?
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर गेल्याने पंजाबची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. लॉकीची दुखापत गंभीर असल्याने तो उर्वरित स्पर्धेत खेळणार नाही असं प्रशिक्षक जेमी होप्स यांनी सांगितलं. दरम्यान लॉकीऐवजी पर्यायी खेळाडूची निवड अद्याप तरी पंजाब संघाने केलेली नाही.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोरखिया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकारिया
PBKS vs KKR Live: पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ
शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे.