IPL 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Highlights: सुयश शर्मा आणि कृणाल पंड्या यांच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर बंगळुरूने पंजाबला १५७ धावांतच रोखलं. विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल या दोघांच्या अर्धशतकासह बंगळुरूने सहज विजय मिळवला.
बंगळुरूचा सफाईदार विजय
विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल यांच्या अर्धशतकांच्या बळावर बंगळुरूने पंजाबवर ७ विकेट्सनी विजय मिळवला.
विराट कोहलीचं अर्धशतक
विराट कोहलीने लौकिकाला साजेसा खेळ करत अर्धशतकी खेळी केली.
अर्धशतकानंतर पड्डीकल बाद
६१ धावांची खेळी करून देवदत्त पड्डीकल तंबूत परतला आहे.
देवदत्त पड्डीकलचं अर्धशतक; बंगळुरू विजयाच्या दिशेने
डावखुऱ्या देवदत्त पड्डीकलने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत खणखणीत अर्धशतक साकारलं.
बंगळुरूची भिस्त कोहलीवर
छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची भिस्त विराट कोहलीवर आहे. फिल सॉल्ट झटपट बाद झाला आहे.
शशांक सिंग आणि मार्को यान्सनची भागीदारी; पंजाब १५७
शशांक सिंग आणि मार्को यान्सन यांच्या ४३ धावांच्या भागीदारीच्या बळावर पंजाबने १५७ धावांची मजल मारली. शशांकने ३१ तर यान्सनने २५ धावांची खेळी केली.
पंजाबचे सहा शिलेदार तंबूत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी शरणागतीच पत्करल्याचं चित्र आहे. जोश इंगलिस आणि मार्कस स्टॉइनस हे अनुभवी खेळाडूही तंबूत परतले आहेत. सुयश शर्माने या दोघांना त्रिफळाचीत केलं.
नेहल वढेरा रनआऊट
टीम डेव्हिड आणि विराट कोहली यांच्या थ्रो च्या बळावर नेहला वढेरा रनआऊट झाला. पंजाबची अवस्था ७६/४ अशी झाली आहे.
कृणाल पंड्याचा अफलातून झेल; रोमारिओ शेफर्डने श्रेयस अय्यरला धाडलं तंबूत
यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या रोमारिओ शेफर्डने श्रेयस अय्यरला बाद केलं. प्रचंड ऊन आणि आर्द्र वातावरणातही कृणाल पंड्याने प्रचंड अंतर कापून अफलातून झेल टिपला.
प्रभसिमरनही कृणालचीच शिकार
कृणाल पंड्याच्या डावखुऱ्या फिरकीसमोर पंजाबचा दुसरा सलामीवीरही निरुत्तर ठरला. प्रभसिमरनने ३३ धावांची खेळी केली.
प्रियांश आर्य तंबूत
फिरकीपटू कृणाल पंड्याविरुद्ध फटकेबाजी करण्याचा मोह प्रियांश आर्यला रोखता आला नाही. टीम डेव्हिडने त्याचा सोपा झेल टिपला. त्याने २२ धावा केल्या.
बंगळुरूच्या संघात रोमारिओ शेफर्डला संधी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ कसे आहेत जाणून घेऊया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
फिल सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार, रोमारिओ शेफर्ड, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाळ, सुयश शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स- देवदत्त पड्डीकल, रसिक धार, मनोज भडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग
पंजाब किंग्ज
प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर, जोश इंगलिस, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनस, मार्को यान्सन, झेव्हियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेयर्स- हरप्रीत ब्रार, विजयकुमार व्यशक, प्रवीण दुबे, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे