Rajat Patidar’s record for RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटचा बोलबाला असला, तरी या संघात आणखी एक फलंदाज आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो खेळाडू रजत पाटीदार आहे, जो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या स्फोटक उजव्या हाताच्या फलंदाजाने पंजाब किंग्जविरुद्ध २३ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. पाटीदार धर्मशाळेच्या खेळपट्टीवर उतरताच दमदार फटकेबाजी सुरु केली. त्याने आपल्या खेळीत ६ षटकार आणि ३ चौकार लगावले. या खेळीदरम्यान पाटीदारने एक मोठा विक्रमही मोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रजत पाटीदारची विक्रमी खेळी –

या खेळीच्या जोरावर रजत पाटीदारने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे जो साध्य करणे अजिबात सोपे नाही. खरेतर, रजत पाटीदार हा आरसीबीचा एकमेव खेळाडू ठरला आहे, ज्याच्या बॅटने २१ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत तीन अर्धशतके झळकावली आहेत. पाटीदारने या मोसमात तिन्ही अर्धशतके झळकावली आहेत. पाटीदारने हैदराबादविरुद्ध १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. यानंतर या खेळाडूने केकेआरविरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक केले.

आता पंजाबविरुद्धही रजतने २१ चेंडूंत अर्धशतक ठोकले आहे. मात्र, पंजाब किंग्जच्या खेळाडूंनीही रजत पाटीदारला अर्धशतक झळकावण्यात मदत केली. रजतचे दोन झेल सोडण्यात आले. त्याचा पहिला झेल हर्षल पटेलने सोडला आणि त्यावेळी या खेळाडूने आपले खातेही उघडले नव्हते. यानंतर आठव्या षटकात राहुल चहरच्या चेंडूवर त्याचा झेल सुटला.

हेही वाचा – केएल राहुल लखनऊची साथ सोडणार? LSGचे मालक संजीव गोयंका यांच्याबरोबरचा VIDEO व्हायरल झाल्यांनंतर चर्चांना उधाण

रजतने अर्धशतकांचा ठोकला खास ‘चौकार’ –

रजत पाटीदारने या मोसमात चार अर्धशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे त्याच्या बॅटने झळकावलेली चारही अर्धशतके प्रतिस्पर्ध्याच्या घरी आली आहेत. म्हणजे रजत पाटीदार चिन्नास्वामीमध्ये अपयशी ठरला असला, तरी त्याने वानखेडे, कोलकाता, हैदराबाद आणि धर्मशाला येथे अर्धशतके झळकावली आहेत. रजतच्या बॅटने केलेली ही खेळी देखील खास आहे. कारण आयपीएलपूर्वी इंग्लंडच्या मालिकेत तो सपशेल अपयशी ठरला होता आणि आता त्याने शानदार पुनरागमन केले आहे, जे कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pbks vs rcb rajat patidar becomes first player to score three fifties in 21 balls or less for rcb in ipl history vbm