आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहे. या हंगामातील प्रत्येक सामन्यात विजयासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन संघांमध्ये खेळवला गेलेला २३ सामना तर चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात पंजाबने दणदणीत विजय मिळवला असून मुंबईला सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान एकीकडे पराभवाचे शल्य बोचत असताना आता दुसरीकडे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासह सर्वच खेळाडूंना मोठा फटका बसला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे रोहितसह पूर्ण संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >> MI in IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा संघ ‘प्ले ऑफ्स’च्या शर्यतीमधून बाहेर?; समजून घ्या Playoffs चं गणित

स्लो ओव्हर रेटमुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आता २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ही दुसरी चूक असल्यामुळे पूर्ण संघाला सहा लाख रुपये किंवा २५ टक्के रक्कम मॅच फिस यापैकी जी रक्कम कमी असेल ती दंड म्हणून आकारण्यात येणार आहे. याआधीही दिल्ली कॅपिटल्स सोबतच्या सामन्यात रोहित शर्माकडू हीच चूक झाली होती. यावेळी रोहितला बारा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. स्लो ओव्हर रेटच्या नियमाप्रमाणे सामन्यामध्ये वीसवे षटक ८५ व्या मिनिटाच्या आत सुरु करणे बंधनकारक आहे. मात्र रोहित शर्मा तसेच मुंबई टीमकडून हे होऊ शकले नाही. त्यामुळे आयपीएलने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा >> ४, ६, ६, ६, ६…, मुंबईच्या बेबी एबीची तुफानी फलंदाजी, पंजाबचे खेळाडू बघतच राहिले

हीच चूक तिसऱ्यांदा केली तर रोहित शर्माला ३० लाख रुपयांचा दंड तसेच एक आयपीएल सामना खेळण्यावर बंदी येऊ शकतो. दरम्यान, पंजाब विरोधातील सामन्यामध्ये मुंबईला बारा धावांनी हार पत्करावी लागली. पंजाबने मुंबईसमोर १९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबई संघ फक्त १८६ धावा करु शकला होता.

Story img Loader