Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD : आयपीएल २०२४ मधील ३३वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. शेवटच्या षटकांपर्यंत रोमहर्षक सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा ९ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामात आपला तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत तीन विकेट्स घेतल्या. यानंतर वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू इयान बिशप यांनी बुमराहच्या कामगिरीचे कौतुक करताना एक मोठं वक्तव्य केलं आहे, जे सध्या खूप चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इयान बिशप यांना असा विश्वास आहे की, बुमराहला क्रिकेटमधून निवृत्त होण्यापूर्वीच भारतातील तरुण आणि महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूंसाठी वेगवान गोलंदाजी ‘लेक्चर्स’ आयोजित करण्यासाठी खेळाचे ज्ञान आणि कौशल्य आहे. त्याच्या या कौशल्याचा तरुण महत्त्वाकांक्षी वेगवान गोलंदाजांसाठी फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर बिशप म्हणाले, या कामाला वेळ देण्यासाठी जसप्रीत बुमराहच्या निवृत्त होण्याची वाट पाहण्याची गरज नाही.

इयान बिशप काय म्हणाले?

बिशप यांनी एक्सवर पोस्ट करत बुमराहचे कौतुक करताना लिहिले, “जर मी जसप्रीत बुमराहला वेगवान गोलंदाजीसाठी पीएचडीसाठी नामांकित करू शकलो, तर मी तसे करेन. कारण तो एक हुशार संवादक, ज्ञानी आणि स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. त्यामुळे मी त्याला देशभरातील सर्व स्तरांवर तरुण महत्त्वाकांक्षी वेगवान गोलंदाजांसाठी गोलंदाजी ‘लेक्चर्स’ आयोजित करण्यास सांगेन. या कामासाठी मी बुमराह निवृत्त होण्यापर्यंतची वाट पाहणार नाही.”

हेही वाचा – PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू

बुमराहने सामना कसा पलटवला?

पंजाब किंग्जकडून १९३ धावांचा पाठलाग करताना शंशाक सिंग शानदार फलंदाजी करत होता. त्यामुळे हा सामना मुंबईच्या हातातून निसटण्याचा मार्गावर होत. मात्र, जसप्रीत बुमराहने १३व्या षटकात केवळ ३ धावा देऊन फॉर्मात असलेल्या शशांक सिंगची विकेट घेत धावांवर अंकुश लावला. त्याचबरोबर सामन्यात ३ विकेट्स घेत सामना पलटवला. या स्पेलसह, बुमराहने आता ७ सामन्यात १३ विकेट्स घेत आयपीएल २०२४ च्या पर्पल कॅपवर कब्जा केला आहे.

हेही वाचा – IPL 2024: तिलक वर्माचा जबरदस्त शॉट स्पायडर कॅमवर जाऊनच आदळला, पण फटका बसला हर्षल पटेलला

सूर्यकुमार यादवची शानदार खेळी –

दुखापतीनंतर आयपीएलमध्ये उशिरा सामील झालेल्या सूर्या प्रत्येक सामन्यात धावांचा पाऊस पाडत आहे, ज्यामुळे असे वाटत नाही की त्याने दुखापतीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. पंजाबविरुदच्या सामन्यातही त्याच्या शानदार फलंदाजीची झलक दिसून आली. त्याने ५३ चेंडूचा सामना करताना ७ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ७८ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर तिलक वर्माने शेवटच्या टप्प्यात १८ चेंडूत ३४ धावांची खेळी केल्याने मुंबई इंडियन्सला १९२ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phd for professor bumrah ian bishop heaps praise on mi pacer after pbks heroics after ipl 2024 matc number 33 vbm