IPL 2025 Phil Salt Run Out RCB vs DC: आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीच्या सलामी जोडीने वादळी फटकेबाजी करत ३ षटकात ५३ धावा केल्या. फिल सॉल्टने स्टार्कच्या एका षटकात ३० धावा कुटल्या होत्या. पण फिल सॉल्ट चौथ्या षटकात धावबाद झाला अन् आरसीबीच्या विकेट्सचा सिलसिला सुरू झाला. पण सॉल्टच्या या विकेटचं खापर चाहत्यांनी विराट कोहलीच्या डोक्यावर फोडलं आहे.

विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी आक्रमक फलंदाजी करत फक्त ३ षटकांत संघाची धावसंख्या ५० धावांच्या वर नेली. पण चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर असं काही घडलं ज्यामुळे सामन्याचा रोख बदलला. विराट कोहलीच्या चुकीच्या कॉलमुळे फिल सॉल्ट धावबाद झाला. कोहलीच्या या चुकीमुळे चाहते खूप संतापले आहेत. यानंतर संघ पूर्णपणे डगमगला आणि एकामागून एक विकेट गमावल्या. एकेकाळी आरसीबी संघ एकही विकेट न गमावता ६१ धावांवर होता. पण पुढच्या १० धावा जोडताना संघाने तीन विकेट गमावल्या.

अक्षर पटेल चौथे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, सॉल्टने एक्स्ट्रा कव्हरवर शॉट खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला, कोहलीनेही धाव घेण्यासाठी कॉल दिला आणि धावण्यास सुरुवात केली, पण मध्येच तो थांबला आणि सॉल्टला मागे वळावे लागले. दरम्यान, विपराज निगमच्या थ्रोवर केएल राहुलने बेल्स उडवल्या अन् सॉल्ट धावबाद झाला. सॉल्ट परत धावत जाताना मैदानावर घसरून पडला आणि वेळेत पोहोचू शकला नाही.

सॉल्टच्या विकेटनंतर संघाने एकामागून एक तीन विकेट गमावल्या. संघाची पहिली विकेट ६१ धावांवर पडली आणि विराट कोहलीही ७१ धावांवर झेलबाद झाला. समोर आलेल्या रेकॉर्डनुसार, आयपीएलच्या इतिहासात २४ वेळा असं घडले आहे की कोहलीचा जोडीदार त्याच्या चुकीमुळे धावबाद झाला आहे, तर विराट स्वतः ८ वेळा धावबाद झाला आहे.

फिल सॉल्टला झेलबाद केल्यानंतर विराट कोहली मैदानावर असताना समोरचा खेळाडू धावबाद झाल्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये वनडे वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादव धावबाद झाला होता, दुसरा फोटो भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंत धावबाद झालेला. तर तिसरा फोटो भारत वि. न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत स्वत: धावबाद झाला होता. तर चौथा फोटो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील यशस्वी जैस्वाल धावबाद झाला होता. याशिवाय इतर काही सामन्यांमधील रनआऊटचे फोटोही व्हायरल होत आहेत.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या तिसऱ्या षटकातच आरसीबीने ५० धावा पूर्ण केल्या. या षटकात स्टार्कने एकूण ३० धावा खर्च केल्या. पण यानंतर, सॉल्ट बाद होताच सामन्याचा रोख बदलला. पॉवर प्लेमध्ये, आरसीबीने दोन विकेट गमावल्यानंतर ६४ धावा केल्या. पॉवर प्लेनंतर, आरसीबीने ७ व्या षटकात विराट कोहलीची विकेटही गमावली. लेग-स्पिनर विपराज निगमच्या गोलंदाजीवर मिचेल स्टार्कने त्याला लॉन्ग ऑफवर झेलबाद केले. कोहलीने २२ धावा केल्या. तर डेव्हिडने ३७ धावांची खेळी करत संघाला १६३ धावांपर्यंत नेले.