What is the equation for playoffs : आयपीएल २०२४ मधील सर्व दहा संघाने यंदाच्या हंगामातील त्यांचे ६ सामने खेळले आहेत. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघांनी फक्त ७ सामने खेळले आहेत. दरम्यान, यंदा आता कोणते संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील आणि कोणते मागे राहतील, याचीही चर्चा सुरू झाली आहे. अशात, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने आपले स्थान प्लेऑफमध्ये जवळपास पक्के केले असले, तरी इतर संघांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल क्रमांकावर –
मंगळवारी जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. हा सामना गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघात होती. सामना चुरशीचा होईल, असे आधीच वाटत होते आणि शेवटी तसेच झाले. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकेल हे माहीत नव्हते, मात्र शेवटी राजस्थान रॉयल्सने हा रोमहर्षक सामना २ विकेट्सनी जिंकला. त्यामुळे, राजस्थान संघ अजूनही अव्वल स्थानावर कायम असून त्यांचे आता ७ सामन्यातून १२ गुण झाले आहेत. त्यामुळे हा संघ पहिल्या दोन स्थानावर लीग टप्पा संपवण्याचा प्रयत्न करेल. कारण संघाला यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन संधी मिळतील.
प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान १६ गुणांची आवश्यकता –
यंदा आयपीएल २०२४ मध्ये १० संघ सहभागी झाले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून १० संघ सहभागी होत आहेत. जर आपण २०२२ आणि २०२२ या वर्षांच्या गुणतालिकेवर नजर टाकली, तर आपल्याला असे दिसून येते की प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघाला १४ पैकी किमान ८ सामने जिंकावे लागतील. कारण दोन्ही वर्ष चौथ्या स्थानावर राहिलेल्या संघाचेही १६ गुण होते. २०२२ मध्ये आरसीबी १६ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचले होते, तर २०२३ मध्ये मुंबई १६ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचले होते.
हेही वाचा – IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव
प्लेऑफसाठी केकेआर, सीएसके आणि एसआरएचही प्रबळ दावेदार –
राजस्थान रॉयल्सच्या १२ गुणांशिवाय केकेआर, सीएसके आणि एसआरएचचेही ८ गुण आहेत. याचा अर्थ या संघांना त्यांच्या उर्वरित किमान ८ सामने अजून जिंकावे लागतील. त्यांच्यासाठी हे फार कठीण काम नाही, पण सध्या जे संघ गुणतक्त्यात तळाला आहेत, त्यांच्यासाठी अडचणी वाढू शकतात. विशेषत: आरसीबीसाठी, आतापर्यंत खेळलेल्या सातपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. जर संघाने आणखी एक सामना गमावला, तर हा संघ पुढे जाणे निश्चितच खूप आहे. मात्र, आतापर्यंत कोणताही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही किंवा कोणताही संघ बाहेर पडलेला नाही.
हेही वाचा – KKR vs RR : जोस बटलरचं धोनी-कोहलीबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाला, “ते दोघे ज्या प्रकारे शेवटपर्यंत…”
आरसीबीशिवाय पंजाब, मुंबई आणि दिल्लीची अवस्था बिकट –
आरसीबी व्यतिरिक्त पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे आता प्रत्येकी दोन सामने जिंकून चार गुण झाले आहेत. त्यामुळे या संघांनी आणखी काही सामने गमावले तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण मग १६ गुण मिळवणे त्यांच्यासाठी कठीण काम ठरू शकते. जीटी आणि एलएसजा सध्या प्रत्येकी सहा गुणांसह गुणतालिकेत मध्यभागी आहेत. त्यांनीही इथूनच विजयाची सुरुवात करण्याची गरज आहे. आणखी काही सामन्यांनंतर कोणते संघ प्लेऑफमध्ये जाणार आणि कोणते बाहेर पडणार याचा अंदाज येईल. यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागेल.