Chennai Super Kings Ban Demand: काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे क्रिकेट चाहते सध्या आयपीएल २०२३ चा आनंद लुटत आहेत. आयपीएल २०२३ च्या रोमांचक सामन्यांनी या हंगामात आणखी मजा आणली आहे. प्रत्येक सीझनप्रमाणे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या टीम चेन्नई सुपर किंग्जवर आहेत. मात्र, दरम्यान, तामिळनाडूच्या एका आमदाराने सीएसकेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

विधानसभेत केली बंदी घालण्याची मागणी –

धर्मपुरी, तामिळनाडू येथील पीएमके आमदार, एसपी व्यंकटेश्वरन यांनी आयपीएल फ्रँचायझीकडे कोणतेही स्थानिक खेळाडू नसल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) वर बंदी घालण्याची राज्य सरकारला विनंती केली. मंगळवारी विधानसभेत क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या अनुदानाच्या मागणीदरम्यान पीएमके आमदारांनी ही माहिती दिली. माध्यमांसमोर आपल्या मुद्द्याचा पुनरुच्चार करताना, ते म्हणाले की त्यांनी विधानसभेत केवळ जनतेच्या भावनांबद्दल सांगितले आहे.

High Court clarified that only state government can set guidelines for the Coldplay ticket black market
कोल्ड प्लेच्या कार्यक्रमाच्या तिकिट विक्रीबाबत न्यायालय काय म्हणाले?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
mumbai High Court ordered government to set up committee to consider phased ban on diesel and petrol vehicles
डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य? वायू प्रदूषण रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे न्यायालयाचे आदेश
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप, मेटाच्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी
High Court ordered Sakinaka police to protect inter-caste couple
कुटुंबाचा विरोध असलेल्या आंतरजातीय जोडप्याचे संरक्षण करा, उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?

निक खेळाडूंना संधी दिली जात नाही –

ते म्हणाले की, मोठ्या संख्येने तरुण आयपीएलचे सामने मोठ्या आवडीने पाहतात. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. आमचे नेते अय्या (डॉ. रामादोस) यांनी ‘इन सर्च ऑफ तमिळ’ ही मोहीम तरुणांमध्ये तमिळ भाषेच्या रक्षणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरू केली आहे. ते पुढे म्हणाले की, अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि सांगितले की, संघाचे नाव चेन्नई असे असूनही हा संघ प्रतिभावान स्थानिक खेळाडूंना संधी देत ​​नाही म्हणून ते दुःखी आहेत. या संघावर बंदी घातली पाहिजे.

हेही वाचा – IPL 2023 MI vs DC: सूर्यकुमार यादवचा बॅड पॅच सुरूच! पुन्हा पहिल्याच चेंडूवर बाद

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मी आज विधानसभेत लोकांच्या भावना सांगितल्या. ते तामिळनाडूचे प्रतिनिधीत्व करत असल्याने आमच्या लोकांद्वारे ते नफा कमावत आहेत, पण संघात तामिळनाडूचे एकही खेळाडू नाही. आमच्या राज्यातील आणखी लोकांनी संघाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे.” बुधवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.

कोणते खेळाडू सीएसकेचा भाग आहेत?

सीएसके खेळाडूंची २०२३ यादी: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार अखिल देशपांडे, पट्टान देशपांडे, सिमरजीत सिंग, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश थिकशन, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधू , सिसांडा मगला, अजय मंडल, भगत वर्मा.

Story img Loader