आयपीएल २०२३चा प्रवास दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खूप वाईट होता जिथे त्यांनी ११ पैकी फक्त ४ सामने जिंकले आहेत आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपल्या आहेत. जरी रिकी पॉटिंगची दिल्ली कॅपिटल्स आयपीएलच्या या हंगामातून अधिकृतपणे बाहेर पडली नसली तरी ते प्लेऑफमध्येही स्थान मिळवणार नाहीत हे निश्चित झाले आहे. दरम्यान, रिकी पॉटिंगने सौरव गांगुलीसोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे. पॉटिंग दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी सौरव गांगुलीसोबत काम करत आहे जेथे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष डीसीचे क्रिकेटिंग ऑपरेशन्सचे संचालक आहेत.
या दोन्ही दिग्गजांनी २०१९ मध्येही एकत्र काम केले होते आणि त्या वर्षी दिल्ली संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर गांगुली या मोसमात पुन्हा परतला आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा हंगाम खूप खराब गेला आहे. ते कधीच हा अनुभव विसरू शकणार नाही. रिकीने पराभवाच्या कारणांबद्दल बोलले नाही परंतु संघ, नियमित कर्णधार ऋषभ पंतशिवाय खेळत आहे, डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली संघ संघटित होताना दिसत नाही, फलंदाजीत पूर्णपणे विखुरलेले वातावरण आहे कोणाचा कोणाला ताळमेळ नाही.
दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टवर बोलताना पॉटिंग म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रतिस्पर्ध्याबद्दल बोलता तेव्हा गांगुली आणि स्टीव्ह वॉ यांच्यात जास्त खटके उडाले आहेत. सौरव गांगुली आणि माझ्यात फारसे काही वाद तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आम्ही दोघे एकमेकांविरुद्ध खूप खेळलो आहोत. २००३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषक फायनलमध्येही भारतीय संघांचे नेतृत्व केले आहे. पण तो २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला आणि त्यानंतर सर्व काही बदलू लागले. तो बीसीसीआयमध्ये अध्यक्ष झाला आणि आता तो पुन्हा आमच्यात सामील झाला आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे.”
रिकी पॉटिंगने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले आणि पुढे म्हणाला, “आम्ही आता एकत्र चांगले काम करत आहोत कारण आम्हाला या फ्रँचायझीसाठी खूप काही करायचे आहे. आम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की दिल्ली कॅपिटल्स संघ फक्त सहभागी होण्यासाठी येत नाही तर ट्रॉफी सुद्धा एकदिवस जिंकणार. हेच आम्हाला दाखवून द्यायचे आहे. जरी आम्ही चांगले मित्र भूतकाळात नसलो तरीही आता आम्ही चांगले मित्र झालो आहोत. जेव्हा तुम्ही एखाद्या संघासाठी काम करत असता तेव्हा तुम्हाला एकत्र राहून एका दिशेने लक्ष केंद्रित करावे लागते.” भूतकाळात जे घडले ते सोडा. ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद भूषवण्याबाबतही बोलले.
पॉटिंगने हरभजन सिंगला मैदानावरील त्याचा सर्वात प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून नाव दिले. पण भज्जी मुंबई इंडियन्स संघात त्याच्या नेतृत्वाखाली खेळत होता. जिथे पॉटिंग हरभजनच्या बॉलवर कॅच घेईल आणि मग दोघेही एकमेकांना मिठी मारतील. या सर्व गोष्टी आयपीएलमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तीव्र स्पर्धा बर्याच प्रमाणात कमी होते.