Rohit Sells Milk Bags For Cricket Kit: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. त्याच्या आक्रमक फलंदाजीची भीती प्रत्येक विरोधी गोलंदाजाच्या मनात असते. रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी त्याचे आयुष्य आणखी संघर्षमय होते. रोहितचा मित्र आणि त्याचा सहकारी खेळाडू प्रज्ञान ओझा याने रोहितच्या संघर्षाच्या दिवसांची कहाणी मांडली आहे.

प्रज्ञान ओझाने सांगितले की, अंडर-15 राष्ट्रीय शिबिरात जेव्हा तो रोहितला भेटला, तेव्हा प्रत्येकजण त्याच्याबद्दल म्हणायचे की तो एक खास खेळाडू आहे. रोहितबद्दल प्रग्यानने सांगितले की तो एक टिपिकल बॉम्बे आहे आणि जास्त बोलत नव्हता, पण खूप आक्रमक होता.ओझा आणि रोहित लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि आयपीएलच्या उद्घाटनाच्या आवृत्तीत डेक्कन चार्जर्सकडून एकत्र खेळले. सध्या रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

क्रिकेट कीट घ्यायला पैसे नसायचे म्हणून दुधाच्या पिशव्या विकायचा –

जिओ सिनेमावरील ‘माय टाईम विथ रोहित’मध्ये प्रज्ञान ओझा म्हणाला, “तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होता, मला आठवते की, त्याच्या क्रिकेट किटचे बजेट कसे मर्यादित होते, हे सांगताना तो एकदा भावूक झाला होता. एवढेच नाही तर त्याने दुधाच्या पिशव्या विकण्याचे कामही केले आहेत. होय, कारण त्याला स्वतःचे क्रिकेट किट विकत घेण्याइतके पैसे नसायचे. म्हणून तो अशा प्रकारची कामं करायचा. हे सर्व जुने आहे. आता जेव्हा मी त्याला पाहतो, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. त्याचा प्रवास कसा सुरू झाला होता आणि तो आता कुठे पोहोचला आहे.”

हेही वाचा – Jarrod Kaye: नॉन स्ट्राइक एंडवर धावबाद होताच संतापला फलंदाज, अन् मैदानातच घातला राडा, पाहा VIDEO

मिमिक्री करण्यात रोहित शर्मा मास्टर –

रोहितशी त्याची मैत्री कशी दृढ झाली याबद्दल बोलताना प्रग्यान ओझा म्हणाला, “रोहितला रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याची संधी मिळेपर्यंत आम्ही एकमेकांना ओळखत होतो. पण जेव्हा आम्हाला आमच्यातील समान मुद्दे सापडले, तेव्हा आमची मैत्री आणखी घट्ट झाली. तो मिमिक्री करण्यात मास्टर आहे. मला खोड्या-नक्कल करणारे लोक आवडतात आणि रोहित त्यापैकीच एक आहे. अंडर-19 स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे दडपण आम्हा दोघांवर होते. जेव्हा-जेव्हा त्याने पाहिले की मी थोडा दडपणाखाली आहे, तेव्हा तो यायचा आणि नक्कल करायचा आणि त्यामुळे माझी चिंता दूर व्हायची आणि आम्ही फक्त हसत राहायचो.”

रोहित शर्माची क्रिकेट कारकीर्द –

रोहित शर्माने २००७ मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ४९ कसोटीत ९ शतके आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने ३३७९ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने २४३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३० शतके आणि ४८ अर्धशतकांच्या मदतीने ९८२५ धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित शर्माने १४८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४ शतके आणि २९ अर्धशतकांच्या मदतीने ८३६५ धावा केल्या आहेत.

Story img Loader