आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४७ वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थानला सात गडी राखून पराभूत केलं. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्सने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र राजस्थानला शेवटी पराभवाचा सामना करावा लागला. पराभव आणि विजय वगळता या सामन्यात एक विशेष बाब घडली. केकेआरच्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करताना ट्रेंट बोल्ट चांगलाच जखमी झाला असता. मात्र बोल्टने सतर्कता दाखवल्यामुळे अपघात टळला.

हेही करतो >> आयपीएलच्या अंतिम सामन्याचं ठिकाण ठरलं, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार थरार!

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?

सामना सुरु असताना नेमकं काय घडलं?

राजस्थानने केकेआरला विजयासाठी १५३ धावांचे लक्ष्य दिले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी बाबा इंद्रजित आणि आरॉन फिंच ही जोडी सलामीला आली. ही जोडी सावध पवित्रा घेत फलंदाजी करत होती. केकेआरच्या १६ धावा झालेल्या असताना गोलंदाजीसाठी आलेल्या ट्रेंट बोल्टसोबत मोठा अपघात होणार होता. चेंडू लागून तो जखमी होण्याची शक्यता होती. ट्रेंट बोल्ट तिसरे षटक टाकण्यासाठी आला होता. यावेळी पहिल्याच चेंडूवर बाबा इंद्रजितने फटका मारला.

पाहा व्हिडीओ :

हेही करतो >> शिक्षण फक्त आठवी पास, काम मिळवण्यासाठी धडपड; जाणून घ्या केकेआरचा खेळाडू रिंकू सिंहचा संघर्ष

मात्र चेंडू थेट प्रसिध कृष्णाच्या हातात विसावल्यामुळे त्याने धाव वाचवण्यासाठी स्ट्राईक एंडकडे चेंडू जोरात फेकला. मात्र स्टंप्सकडे जाण्याऐवजी चेंडू थेट ट्रेंट बोल्टला जाऊन लागला. चेंडू वेगाने आपल्याकडे येत असल्याचे समजताच ट्रेंट बोल्टने उडी घेतली. ज्यामुळे चेंडू त्याच्या पायाला लागला. बोल्टने उडी घेतली नसती तर चेंडू त्याचा गुडघा किंवा अन्य ठिकाणी लागला असता. परिणामी तो गंभीर जखमी होण्याची शक्यता होती.

“१२-१३ तास काम करायचो, दिवसाला ३५ डॉलर मिळायचे,” आरसीबीच्या हर्षल पटेलने सांगितली कठीण काळातील आठवण

हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सतर्क राहिल्यामुळे ट्रेंट बोल्टला कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान या सामन्यात राजस्थानचा पराभव झाला. तर केकेआरने हा सामना सात गडी राखून खिशात घातला.

Story img Loader