Punjab Kings Jersey Unveiled for IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघ पंजाब किंग्जने शनिवार, १६ मार्च रोजी चंदीगड येथील एलांटे मॉल येथे आगामी आयपीएल २०२४ साठी त्यांच्या जर्सीचे अनावरण केले. कार्यक्रमादरम्यान पीबीकेएसचा कर्णधार शिखर धवन, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, यष्टिरक्षक जितेश शर्मा आणि सहमालक प्रीती झिंटा देखील उपस्थित होती. यावेळी प्रीती झिंटाने आयपीएल फ्रँचायझींच्या जर्सीच्या रंगाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्यक्रमादरम्यान पीबीकेएसचा कर्णधार शिखर धवन, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, यष्टिरक्षक जितेश शर्मा आणि सहमालकीन प्रीती झिंटा देखील उपस्थित होती. या कार्यक्रमात झिंटाने आगामी हंगामासाठीच्या जर्सीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आणि २००९-२०१३ मधील लाल आणि तपकिरी रंगाचे मिश्रण असलेली पंजाबच्या जुन्या जर्सीबद्दल एक खुलासा केला.

प्रीती झिंटाने खुलासा केला की बीसीसीआयने पांढरा, राखाडी आणि सिल्वर यांसारख्या रंगांवर बंदी घातली आहे. कारण ते चेंडूच्या रंगासारखे दिसतात. त्यामुळे, फ्रँचायझीला आपल्या आवडते रंग बदलावे लागले आणि आता ते पूर्णपणे लाल रंगात दिसतात.

प्रीती झिंटाचा जर्सीच्या रंगाबद्दल खुलासा –

प्रीती झिंटाने सांगितले की, “यापूर्वी, आमच्याकडे लाल, राखाडी आणि सिल्वरचे संयोजन होते, परंतु नंतर बीसीसीआयने बॉल दिसण्यात समस्येमुळे चांदी, राखाडी आणि पांढऱ्या रंगावर बंदी घातली आहे. म्हणून, आम्ही लाल रंगासह पुढे गेलो आणि यावर्षी आमच्याकडे लाल रंगाचे सर्वोत्तम संयोजन आहे.”

हेही वाचा – WPL 2024 : स्मृतीने जेतेपदाचा आनंद कोणाबरोबर केला साजरा? फोटो होतोय व्हायरल

पंजाब किंग्ज २३ मार्च रोजी आयपीएल २०२४ मध्ये त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. शिखर दिल्लीविरुद्ध त्याच्या होम ग्राउंड मोहालीवर आपल्या दिग्गजांसह उतरणार आहे. त्याच्या समोर ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preity zinta reveals why bcci banned silver grey and white colour combinations in ipl jerseys vbm