Priyam Garg has been given a chance to replace Kamlesh Nagarkoti: इंडियन प्रीमियर लीगमध्ये तळाच्या स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सने युवा फलंदाज प्रियम गर्गला संघात सामील केले आहे. प्रियम गर्ग लिलावादरम्यान विकला (अनसोल्ड) गेला नव्हता आणि तो दिल्ली कॅपिटल्स संघात जखमी कमलेश नागरकोटीची जागा घेईल. तथापि, प्रियम गर्गच्या सामील झाल्याबद्दल दिल्ली कॅपिटल्सकडून अधिकृतपणे जाहीर केले जाईल.

या मोसमाच्या सुरुवातीपासूनच वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी दुखापतीशी झुंजत होता. कमलेश दिल्ली कॅपिटल्ससाठी एकही सामना खेळू शकला नाही. तो या आठवड्याच्या सुरुवातीला आयपीएलच्या १६व्या हंगामातून बाहेर पडला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रियम गर्ग आणि बंगाल संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन यांना चाचणीसाठी बोलावले.

Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
Murbad , Kisan Kathore, Subhash Pawar,
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!

स्पोर्ट्सकीडाच्या रिपोर्टनुसार, मंगळवार आणि बुधवारी दोन्ही खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर मधली फळी मजबूत करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने प्रियम गर्गला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला. याआधी प्रियम गर्ग सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. परंतु आयपीएलच्या १६व्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात तो अनसोल्ड राहिला होता.

हेही वाचा – Twitter Removes Blue Ticks: ट्विटरचा क्रिकेपटूंनाही दे धक्का! सचिन-विराटसह धोनीच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक गुल; जाणून घ्या कारण

प्रियम गर्गची आयपीएल कारकीर्द –

प्रियम गर्गला आयपीएलमध्ये तीन हंगाम खेळण्याचा अनुभव आहे. २०२० मध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत प्रियम गर्गने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. यानंतर त्याला सनरायझर्स हैदराबादने १.९० कोटी रुपये खर्चून विकत घेतले. मात्र, गर्ग संघाच्या विश्वासावर खरा ठरु शकला नाही.
गर्गने आतापर्यंत आयपीएलमध्ये १७ सामने खेळले असून यादरम्यान त्याने १५.२९च्या सरासरीने केवळ २५१ धावा केल्या आहेत. या दरम्यान प्रियम गर्गचा स्ट्राईक रेटही केवळ ११५.१४ होता. सलग तीन हंगामातील खराब कामगिरीनंतर सनरायझर्स हैदराबादने प्रियम गर्गला सोडण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या लिलावात प्रियम गर्गवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. तरी आता त्याने आयपीएल २०२३ मध्ये प्रवेश केला आहे.

पाच पराभवानंतर दिल्लीने नोंदवला पहिला विजय –

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल २०२३ ची सुरुवात वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. मोसमातील पहिले ५ सामने गमावल्यानंतर, पहिला विजय गुरुवारी केकेआरविरुद्ध मिळवला. दिल्लीने हा सामना चार विकेट्स राखून जिंकला. डीसी सध्या आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत १०व्या स्थानावर आहे.