IPL 2025 Preity Zinta Special Post for Priyansh Arya: आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सचा युवा खेळाडू प्रियांश आर्यने आपल्या शतकी खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात त्याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जलद शतक झळकावलं. त्याच्या या कामगिरीनंतर संघाची मालकिण अभिनेत्री प्रीति झिंटाने त्याचं कौतुक करत त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यात प्रियांश आर्यने ३९ चेंडूत शतक झळकावले. जे आयपीएलच्या इतिहासातील चौथे सर्वात जलद शतक आहे. तर एखाद्या अनकॅप्ड खेळाडूने झळकावलेले सर्वात जलद शतक आहे. या खेळीनंतर क्रिकेट जगताने त्याचे खूप कौतुक केले.

प्रिती झिंटाची प्रियांश आर्यसाठी स्पेशल पोस्ट

प्रीतीने तिच्या ‘एक्स’ अकाउंटवर प्रियांशबरोबर सामन्यानंतर क्लिक केलेले काही फोटो शेअर केले आणि लिहिले, ‘काल रात्रीचा सामना खूप खास होता. आम्ही क्रिकेटमधील एक स्फोटक सामना पाहिला, एका दिग्गजाची गर्जना आणि एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म पाहिला.

प्रियांश आर्यच्या स्वभावाबद्दल सांगताना प्रिती झिंटाने पुढे लिहिलं, “काही दिवसांपूर्वी मी २४ वर्षीय प्रियांश आर्य आणि आमच्या काही युवा खेळाडूंची भेट घेतली. तो खूप शांत, लाजाळू आणि विनम्र होता आणि संपूर्ण संध्याकाळ तो एकही शब्द बोलला नाही.”

प्रियांशचं कौतुक करताना पुढे पंजाब संघाची मालकिण म्हणाली, “काल रात्री पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यादरम्यान मी त्याला पुन्हा भेटली. यावेळी त्याच्यातील टॅलेंट बोललं आणि त्याच्या आक्रमक फलंदाजीने फक्त मलाच नाहीतर संपूर्ण भारताला चकित केलं. ४२ चेंडूत १०३ धावांची खेळी करत त्याने आपलं नाव रेकॉर्डबुकमध्ये लिहिलं आहे.”

प्रिती शेवटी म्हणाली, “मला तुझा अभिमान आहे प्रियांश आर्य. कायम असाच हसत आणि कामगिरीने चमकत पाहा. आमचं सर्वांच आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूचं मनोरंजन केल्याबद्दल तुझे खूप आभार.”

आर्यने त्याच्या चौथ्या आयपीएल डावात झळकावलेल्या शानदार शतकामुळे टी-२० फ्रँचायझी लीगच्या जगात सर्वात मोठ्या मंचावर त्याच्या आगमनाचा डंका वाजवला. आयपीएल २०२५ साठी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) मध्ये सामील होण्यापूर्वी, आर्यने भोपाळमधील लाल बहादूर शास्त्री अकादमीमध्ये संजय भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyansh arya praised by punjab kings owner preity zinta shared special post for centurion pbks ipl 2025 bdg