धडाकेबाज फलंदाज एरॉन फिंच याने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर पुणे वॉरियर्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजयाची गुढी उभारली. पुण्याच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स व १.२ षटके बाकी राखून पराभव केला. दोन पराभवांनंतर पुण्याचा हा पहिलाच विजय असून राजस्थानची या पराभवामुळे विजयाची हॅटट्रिक हुकली.
गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पुण्याने अखेर विजयाचे खाते उघडले. विजयासाठी १४६ धावांचे आव्हानास सामोरे जाताना रॉबिन उथप्पा व एरॉन फिंच यांनी सलामीसाठी केवळ १९ मिनिटांमध्ये ३१ चेंडूंत ५८ धावांचा पाया रचला. उथप्पाने तीन चौकार व दोन षटकारांसह ३२ धावा केल्या. राहुल द्रवीडने एका हाताने त्याचा झेल अप्रतिमपणे टिपले. त्यानंतर डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत फिंचने चौफेर फटकेबाजी केली. षटकार मारुनच अर्धशतक टोलविणाऱ्या फिंचने ५३ चेंडूंत ६४ धावा करीत संघाचा विजय दृष्टीपथात आणला. त्याच्या या खेळीत तीन षटकार व सहा चौकारांचा समावेश होता. त्याने रॉस टेलरच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. फिंच बाद झाल्यावर युवराजसिंगने दोन षटकार व दोन चौकारांसह नाबाद २८ धावा करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, भारतीय क्रिकेटची पोलादी भिंत म्हणून बीरुद लाभलेल्या राहुल द्रवीडने कर्णधारास साजेसे अर्धशतक केले, त्यामुळेच राजस्थान रॉयल्सला आयपीएल क्रिकेट सामन्यात पुणे वॉरियर्सपुढेजिंकण्यासाठी १४६ धावांचे आव्हान ठेवता आले. नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजी स्वीकारली. भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर राजस्थानच्या कुशल परेरा याला पायचीत करीत पुण्यासाठी झकास सुरुवात केली. मात्र त्यानंतर ग्रेट वॉल असलेला राजस्थानचा कर्णधार राहुल द्रवीड याने अजिंक्य रहाणेच्या साथीत संघाचा डाव सावरला. त्यांनी ६८ चेंडूंमध्ये ८१ धावांची भागीदारी केली. राहुल शर्मा याने अजिंक्यला बाद करीत ही जोडी फोडली. अजिंक्यने २७ चेंडूंमध्ये तीन चौकारांसह ३० धावा केल्या. एका बाजूने आश्वासक खेळ करणारा द्रवीड याने अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या या स्पर्धेतील त्याचे हे दुसरे अर्धशतक आहे. कलात्मक फलंदाजीचा प्रत्यय दाखविणाऱ्या द्रवीडला युवराजने बाद केले. रॉस टेलर याने एका हाताने हा झेल घेतला. त्याने ४८ चेंडूंमध्ये आठ चौकारांसह ५४ धावा केल्या. त्यानंतर जेम्स फॉल्कनर (नाबाद १९) व ब्रॅड हॉज (नाबाद) यांनी संघास ५ बाद १४५ धावांपर्यंत नेले.
पुण्याच्या विजयाचा पाडवा
धडाकेबाज फलंदाज एरॉन फिंच याने केलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर पुणे वॉरियर्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विजयाची गुढी उभारली. पुण्याच्या संघाने राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स व १.२ षटके बाकी राखून पराभव केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-04-2013 at 07:29 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune warriors won by seven vickets on rajasthan royals