आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज हा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. पंजाबने दिलेले लक्ष्य गाठण्याचा मुंबईने पूर्ण ताकतीने प्रयत्न केला. मुंबईच्या सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र शेवटी मुंबईच्या पदरी निराशाच आली. मात्र मुंबईचा शेवटी १२ धावांनी पराभव झाला. दरम्यान, या सामन्यानंतर एक भावुक आणि सचिनच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती देणारा एक प्रसंग समोर आला आहे. सचिन मार्गदर्शक असलेल्या मुंबईला धूल चारल्यानंतरही पंजाबचे कोच जॉन्टी रोड्स यांनी सचिनचे मैदानात पाय धरले आहेत.

हेही वाचा >>> IPL 2022 : ‘बेबी एबी’ची तुफानी फलंदाजी पाहून रोहित शर्मा झाला प्रभावित, मैदानावर येऊन…

मुंबईचा १२ धावांनी पराभव

पंजाब किंग्जने मुंबईसमोर १९८ धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी १९९ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या रोहित शर्माने चांगली सुरुवात केली होती. रोहित २८ धावा करुन झेलबाद झाल्यानंतर देवाल्ड ब्रेविसने तुफानी फलंदाजी करत २५ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. तसेच सूर्यकुमार यादवनेही ४३ धावा करुन मुंबईच्या विजयासाठी प्रयत्न केला. मात्र मुंबईला ही धावसंख्या गाठता आली नाही. मुंबईचा १२ धावांनी पराभव झाला. मुंबईचा हा सलग पाचवा पराभव आहे.

हेही वाचा >>> स्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला २४ लाखांचा दंड, आणखी एक चूक केली तर होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई

सामना संपल्यानंतर मैदानात नेमकं काय घडलं ?

सामना संपल्यानंतर मुंबई आणि पंजाब किंग्जचे खेळाडू तसेच सपोर्टिंग स्टाफ एकमेकांचे अभिनंदन करण्यासाठी मैदानात आले होते. दोन्ही संघाचे खेळाडू रांगेत उभे राहत हस्तांदोलन करत होते. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकर आणि पंजाब संघाचा क्षेत्ररक्षणाचा कोच जॉन्टी रोड्स एकमेकांसमोर आले. त्यानंतर समोर सचिन उभा असल्याचे समजताच जॉन्टी यांनी खाली वाकत त्याचे पाय धरण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिनने जॉन्टी रोड्स यांना पाय पकडू दिले नाही. सचिन जॉन्टी यांना पाय पकडण्यास मज्जाव करत होता. शेवटी जॉन्टी उठल्यानंतर सचिनने त्यांना मिठी मारली.

हेही वाचा >>> MI in IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा संघ ‘प्ले ऑफ्स’च्या शर्यतीमधून बाहेर?; समजून घ्या Playoffs चं गणित

दरम्यान सचिन आमि जॉन्टी रोड्स यांची पहिल्यापासून चांगली मैत्री आहे. पंजाब संघाचे प्रशिक्षक होण्यापूर्वी जॉन्टी यांनी मुंबई संघालाही धडे दिलेले आहेत. सचिन आणि जॉन्टी यांनी काही काळासाठी सोबत काम केलेले आहे. हा प्रसंग सध्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader