आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात धावांचा पाठलाग करतानाचा नवा विक्रम रचत पंजाब किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय साकारला. इडन गार्डन्सच्या मैदानावर चौकार-षटकारांची लयलूट झालेल्या लढतीत कोलकाताने २६१ धावांचा डोंगर उभारला. पंजाबच्या फलंदाजांनी वादळी खेळी रचत अशक्यप्राय वाटणारा विजय साकारला. पंजाबने ८ चेंडू आणि ८ विकेट्स राखून संस्मरणीय विजय मिळवला. कोणत्याही ट्वेन्टी२० स्पर्धेत धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. या सामन्यात विक्रमी ४२ षटकारांची लयलूट झाली. दोन्ही संघांनी मिळून ५२३ धावा चोपल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शतकवीर जॉनी बेअरस्टोने या विजयाचा पाया रचला. प्रभसिमरन सिंग, रायली रुसो आणि शशांक सिंग यांनी बेअरस्टोला तोलामोलाची साथ देत थरारक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बेअरस्टोने ४८ चेंडूत १०८ धावांची नाबाद खेळी साकारली. शशांक सिंगने २८ चेंडूत नाबाद ६८ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली.
पंजाबने प्रयोग सुरू ठेवत जॉनी बेअरस्टोच्या बरोबरीने प्रभसिमरन सिंगला सलामीला पाठवलं. हा प्रयोग यशस्वी ठरला. प्रभसिमन-बेअरस्टो जोडीने पॉवरप्लेमध्येच ९३ धावांची तडाखेबंद सलामी दिली. प्रभसिमरनने १८ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं. सुनील नरेनच्या अचूक धावफेकीमुळे प्रभसिमरन बाद झाला. त्याने २० चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर रायली रुसोने बेअरस्टोला चांगली साथ दिली. संघातून वगळल्यानंतर कसून सराव केलेल्या बेअरस्टोने चौकार, षटकारांची आतषबाजी केली. बेअरस्टो-रुसो जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूत ८५ धावा रचल्या. सुनील नरेनने रुसोला माघारी परतावलं. त्याने १६ चेंडूत २६ धावा केल्या.
Highest successful chase in T20 history! ?
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 26, 2024
????? ??? ???????! ❤️#KKRvPBKS pic.twitter.com/KUdaBS1JwJ
रुसोच्या जागी आलेल्या शशांक सिंगने पहिल्या चेंडूपासून केकेआरच्या गोलंदाजांना पिटाळून लावलं. एकामागोमाग एक षटकार लगावत शशांकने धावगतीचं दडपण खाली आणलं. बेअरस्टोनं ४५ चेंडूत शतक साजरं केलं. प्रचंड उकाडा आणि आर्द्रता अशा वातावरणातही बेअरस्टोने शतक झळकावलं. या स्पर्धेतलं बेअरस्टोचं हे दुसरं शतक आहे. शशांक सिंगने २८ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ६८ धावा करत पंजाबच्या स्वप्नवत विजयावर शिक्कामोर्तब केलं. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ८४ धावा कुटल्या.
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल
कोलकाताने रचला होता डोंगर
तत्पूर्वी २२ चौकार आणि १८ षटकारांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २६१ धावांचा डोंगर उभारला. फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी १३८ धावांची खणखणीत सलामी दिली. या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवल्या. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या नरेनची खेळी राहुल चहरने संपुष्टात आणली. त्याने ३२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. विकेटकीपिंग आणि सलामी अशा दोन्ही भूमिका निभावणाऱ्या सॉल्टने पॉवरप्लेनंतरही फटकेबाजी सुरुच ठेवली. सॅम करनच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची लयलूट केल्यानंतर एका सुरेख यॉर्करवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ७५ धावा चोपल्या.
चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या ड्रे रस अर्थात आंद्रे रसेलने टोलेबाजीला सुरुवात केली. पण अर्शदीपने त्याचा झंझावात रोखला. रसेलने १२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर जोडीने चौथ्या विकेटसाठी १८ चेंडूत ४३ धावा जोडल्या आणि कोलकाताने अडीचशेचा टप्पा ओलांडला. धावबाद होण्यापूर्वी वेंकटेशने २३ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. श्रेयसने १० चेंडूत २८ धावा कुटल्या. कोलकाता एकाक्षणी तीनशेचा टप्पा ओलांडणार असं चित्र होतं पण पंजाबच्या गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं. पंजाबकडून अर्शदीपने २ तर सॅम करन, हर्षल पटेल, राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली.
.@PunjabKingsIPL are roaring again ?
A special victory at the Eden Gardens for #PBKS who secure the highest successful run chase in the IPL and T20s ❤️
Scorecard ▶️ https://t.co/T9DxmbgIWu#TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/FNxVD8ZeW6— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2024