IPL 2025 Punjab Kings Full Squad and Schedule: नवा हंगाम नवे खेळाडू नवा कर्णधार आणि नवे प्रशिक्षक असं काम चालणारा संघ म्हणजे पंजाब किंग्सचा संघ. आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्सने संपूर्ण संघाची नव्याने संघबांधणी केली आहे. रिटेन्शनमध्ये केवळ दोन खेळाडूंना रिटेन करणाऱ्या पंजाब किंग्जने लिलावात श्रेयस अय्यरसाठी तब्बल २६.७५ कोटींची बोली लावली. पंजाबला एका सक्षम कर्णधाराची गरज होती आणि संघाने श्रेयस अय्यरला संघाचे कर्णधारपदही दिले आहे. आता पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ आयपीएल २०२५ साठी कसा असणार, जाणून घेऊया.

पंजाबने डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगसाठी राईट टू मॅचचा अधिकार वापरत त्याला संघात पुन्हा घेतले. लिलावात सलामी करणाऱ्या अर्शदीप सिंगसाठी जोरदार लढाई रंगली. सनरायझर्स हैदराबादने १५ कोटींची बोली लावली. पंजाब किंग्जने राईट टू मॅचचा अधिकार वापरू असं स्पष्ट केलं. अर्शदीप सिंगसाठी १८ कोटी देण्यास तयार असल्याचं पंजाबने स्पष्ट केलं आणि त्याची घरवापसी पक्की झाली. पंजाबने अटीतटीच्या मुकाबल्यात फिरकीपटू युझवेंद्र चहलला संघात सामील केलं. चहलसाठी पंजाबने तब्बल १८ कोटी रुपये मोजले.

पंजाबने माजी कर्णधार ग्लेन मॅक्सवेलला संघात घेतलं आहे. अष्टपैलू मॅक्सवेलला सूर गवसल्यास पंजाबचं नशीब पालटू शकतं. नवीन प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या पुढाकारामुळे पंजाबने अष्टपैलू मार्कस स्टॉइनसला संघात समाविष्ट केलं आहे. विदर्भवीर अष्टपैलू खेळाडू यश ठाकूर लखनौकडून पंजाबच्या गटात आला आहे. मुंबईसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या नेहल वढेराला पंजाबने आपल्याकडे ओढून घेतलं आहे.

पंजाब किंग्सने या हंगामापूर्वी रिकी पाँटिंगला संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून नेमलं आहे. पंजाब किंग्सचा संघ २०२५ च्या लिलावात १२० कोटींपैकी ११०.०५ कोटी अशा सर्वाधिक पर्ससह लिलावात उतरला होता. पंजाबने सर्वाधिक रक्कम खर्चून आंतरराष्ट्रीय तसेच भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणारे एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू संघात घेतले आहेत.

पंजाब किंग्सने लिलावापूर्वी रिटेन केलेले खेळाडू

शशांक सिंग – ५.५ कोटी
प्रभसिमरन सिंग – ४ कोटी

पंजाब किंग्सचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Punjab Kings IPL 2025 Full Squad)

शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहाल वढेरा , हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार विशाक, यश ठाकूर, मार्को यान्सन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अजमतुल्ला उमरझाई, हरनूर पन्नू , कुलदीप सेन, प्रियांश आर्य, ऍरॉन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, प्याला अविनाश, प्रवीण दुबे.

पंजाब किंग्स आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Punjab Match Schedule)

२५ मार्च – गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स
१ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स
५ एप्रिल – पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
८ एप्रिल – पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स
१२ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स
१५ एप्रिल – पंजाब किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
१८ एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स
२० एप्रिल – पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२६ एप्रिल – कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स
३० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स
४ मे – पंजाब किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स
८ मे – पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
११ मे – पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स
१६ मे – राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स

Story img Loader