आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४८ व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला धूळ चारली. पंजाबने आठ गडी आणि चार षटके राखत गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. गुजरातने पंजाबसमोर विजयासाठी १४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ही धावसंख्या पंजाबच्या फलंदाजांनी सहज गाठली. शिखऱ धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन या तीन फलंदाजांनी पंजाबला विजयापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. गुजरातचा या हंगामातील हा दुसरा पराभव आहे.
हेही वाचा >> राहुल तेवतियाला राग अनावर, भर मैदनात साई सुदर्शनवर भडकला, पाहा व्हिडीओ
गुजरातने विजयासाठी दिलेल्या १४४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी पंजाबकडून जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन ही जोडी सलामीला आली. जॉनी बेअरस्टो मैदानावर तग धरु शकला नाही. तो अवघी एक धाव करुन झेलबाद झाला. त्यानंतर मात्र शिखर धवन, भानुका राजपक्षे आणि लियाम लिव्हिंगस्टोन या त्रिकुटाने पंजाबला विजय मिळवून दिला. शिखर धवनने ६२ धावांची नाबाद खेळी केली. तर भानुकाने २८ चेंडूंमध्ये ४० धावा करत पंजाबसाठी विजय सोपा केला. लियाम लिव्हिंगस्टोनने धनवला साथ धेत अवघ्या दहा चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. ज्यामुळे पंजाब किंग्जचा आठ गडी राखून विजय मिळवता आला.
हेही वाचा >> ऋषी धवनला तोड नाही, डायरेक्ट हीट करून शुभमन गिलला केलं ‘असं’ बाद
याआधी नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातचा हा निर्णय चुकीचा ठरला. गुजरातचे सलामीला आलेले दोन्ही फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. वृद्धीमान साहा २१ धावांवर असताना कासिगो रबाडाच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर शुभमन गिल अवघ्या ९ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या साई सुदर्शनने मात्र धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने ५० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ६५ धावांची खेळी केली. सुदर्शनच्या खेळीमुळेच गुजरातला १४३ धावांपर्यंत पोहोचता आले.
हेही वाचा >> शाहरुख खानबाबत पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य, म्हणाला ‘तो खेळांडूसोबत…’
साई सुदर्शन वगळता गुजरातचा एकही फलंदाज चांगली फलंदाजी करु शखला नाही. हार्दिक पांड्याने निराशा केली. अवघी एक धाव करुन तो ऋषी धवनच्या चेंडूवर झेलबाद झाला. तसेच डेविड मिलरदेखील ११ धावा करु शकला. गुजरातचा फिनिशर म्हणून ओळख असलेला राहुल तेवतियादेखील आपली जादू दाखवू शकला नाही. त्याला फक्त ११ धावा करता आल्या. राशिद खान (०) आणि शेवटच्या फळीतील प्रदीप संगवान (२), लॉकी फर्ग्युसन (५), अलझारी जोसेफ (४ नाबाद) खास कमाल दाखवू शकले नाहीत.
हेही वाचा >> प्रसिध कृष्णाकडून मोठी चूक, ट्रेंट बोल्ट झाला असता गंभीर जखमी, पाहा KKR vs RR सामन्यात काय घडलं?
गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर आजचा दिवस पंजाबच्या गोलंदाजांचा होता. पंजाबच्या कासिगो रबाडाने वृद्धीमान साहा, राहुल तेवतिया, राशिद खान अशा आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं. त्याने एकूण चार बळी घेतले. तर ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, आणि अर्षदीप सिंग यांनी प्रत्येक एक बळी घेतला. या गोलंदाजांच्या कामगिरीमुळेच पंजाबला गुजरातला १४३ धावांपर्यंत रोखता आलं.