Quinton de Kock broke AB de Villiers’ record: आयपीएल २०२३ मधील ६३ वा सामना लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला जात आहे. लखनऊच्या एकना स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा फलंदाज क्विंटन डी कॉकने एक मोठा विक्रम रचला आहे. क्विंटन डी कॉकने मुंबई इंडियन्सविरुद्ध १२ धावा करताच टी-२० कारकिर्दीतील नऊ हजार धावा पूर्ण केल्या. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला आहे.

जगातील सहावा फलंदाज ठरला –

डी कॉकने टी-२० कारकिर्दीतील ३०७ सामन्यांच्या २९८व्या डावात ९००० धावा पूर्ण केल्या. या प्रकरणात त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला आहे. ज्याने ३२३ सामन्यांच्या ३०४ डावांमध्ये ९ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. डिव्हिलियर्सचा विक्रम मोडत डी कॉक सर्वात जलद ९,००० धावा पूर्ण करणारा जगातील सहावा खेळाडू ठरला. त्याने शिखर धवन (३०८ डाव), मार्टिन गप्टिल (३१३ डाव), फाफ डू प्लेसिस (३१७ डाव), जोस बटलर (३१८ डाव) यांच्यासह अनेक दिग्गज फलंदाजांना मागे सोडले आहे.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
U19 Asia Cup Final Bangladesh Beat India by 59 Runs And Successfully Defend the Title INDU19 vs BANU19
IND U19 vs BAN U19: बांगलादेशची पोरं हुशार; युवा भारतीय संघाला नमवत पटकावलं U19 आशिया कपचं जेतेपद

सर्वात जलद नऊ हजार धावांचा विक्रम बाबर आझमच्या नावावर –

टी-२० कारकिर्दीतील सर्वात जलद नऊ हजार धावांचा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने २५४ सामन्यांच्या २४५ डावांमध्ये हे स्थान गाठले. ख्रिस गेल २४९, विराट कोहली २७१, डेव्हिड वॉर्नर २७३ आणि अॅरॉन फिंच हे २८१ डावात हे स्थान मिळवणारे अव्वल फलंदाज आहेत. फिंचनंतर आता डी कॉकच्या नावाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – IPL 2023: यशस्वी जैस्वालचा स्त्री अवतार पाहिला का? युजवेंद्र चहलने इन्स्टाग्रामवर शेअर केला मजेशीर फोटो

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर कठीण खेळपट्टीवर डी कॉकला फक्त दोन षटकार मारता आले. त्याने १५ चेंडूत एकूण १६ धावा केल्या. पीयूष चावलाने डी कॉकला इशान किशनकडे झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर लखनऊ संघाने २० षटकांत ३ बाद १७७ धावा केल्या. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक नाबाद ८९ धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने ४७ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकार लगावले. त्याचबरोबर क्रृणाल पांड्या ४९ धावांचे योगदान दिले. तसेच मुंबई इंडियन्स संघापुढे १७८ धावांचे लक्ष्य ठेवले.

Story img Loader