RR vs KKR Quinton De Cock Catch Video: राजस्थान रॉयल्स आणि केकेआरमध्ये गुवाहाटीच्या मैदानावर सामना खेळवला जात आहे. या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात चांगली गोलंदीज केली. नाणेफेक गमावत रियान परागच्या नेतृत्त्वाखाली राजस्थानचा संघ फलंदाजीसाठी उतरला आणि मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. पण संघाने जेमतेम १५१ धावा केल्या आहेत. पण पहिल्या डावातील क्विंटन डि-कॉकच्या झेलने सर्वांचं लक्ष वेधलं.

क्विंटन डी कॉकच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विकेट्सच्या मागे तैनात असलेला डिकॉक झेलसाठी धावत येत असल्याचे दिसून येते. धावण्यापूर्वी डिकॉक त्याचे हेल्मेट काढतो आणि बाजूला टाकतो आणि इतरांनाही थांबवतो आणि यशस्वीरित्या झेल टिपतो.

रियान परागने घऱच्या मैदानावर फलंदाजीला येताच षटकारांच्या मदतीने विस्फोटक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्याने चांगली सुरूवात केली पण मोठी खेळी खेळण्यात तो अपयशी ठरला. वरूण चक्रवर्तीच्या आठव्या षटकात रियान परागने आपली विकेट गमावली.

फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने आठव्या षटकातील पाचवा चेंडू ११८च्या वेगाने टाकला. या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची कड घेत हवेत उंच उडाला. विकेट्सच्या मागे असणाऱ्या डिकॉकने चेंडू वर गेलेला पाहून लगेच आपले हेल्मेट काढून टाकले आणि थांबा सांगत त्याने पिचच्या दिशेने धाव घेतली आणि रियान परागचा यशस्वी झेल टिपला.

परागने १५ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १६६.६७ होता. पराग वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे त्याने लवकर विकेट गमावली. KKR राजस्थान विरुद्ध मोसमातील दुसरा साखळी सामना खेळत आहे. संघाने पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळला होता. RCB विरुद्धच्या सामन्यात KKR ला ७ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.