पीटीआय, मुंबई : यशस्वी जैस्वालच्या (४४ चेंडूंत ५९ धावा) अर्धशतकी खेळीनंतर रविचंद्रन अश्विनच्या (२३ चेंडूंत नाबाद ४०) महत्त्वपूर्ण खेळीमुळे शुक्रवारी झालेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळवला. या विजयामुळे राजस्थानचा संघ ‘क्वालिफायर-१’साठी पात्र ठरला आहे.

ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या लढतीत १५१ धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. जोस बटलर लवकर माघारी परतला. सलामीवीर यशस्वीने संघासाठी उपयुक्त योगदान दिले. तो बाद झाल्यावर संघाच्या अडचणीत भर पडली. मात्र, अश्विन आणि रियान पराग (नाबाद १०) यांनी संघाला १९.४ षटकांत ५ बाद १५१ धावसंख्येपर्यंत पोहोचवत विजय मिळवून दिला. त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने मोईन अलीच्या (५७ चेंडूंत ९३ धावा) खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १५० धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ६ बाद १५० : (मोईन अली ९३, महेंद्रसिंह धोनी २६; यजुर्वेद्र चहल २/२६, ओबेड मॅककॉय २/२०) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १९.४ षटकांत ५ बाद १५१ : (यशस्वी जैस्वाल ५९, रविचंद्रन अश्विन नाबाद ४०; प्रशांत सोलंकी २/२०)

Story img Loader