राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) यंदा लिलावात फारसा रस दाखवलेला नाही. त्यांच्याकडे एकूण नऊ जागा रिक्त होत्या आणि फ्रँचायझीने नऊ खेळाडूंना खरेदी केले. यातील सहा खेळाडूंना राजस्थानने शेवटच्या फेरीत विकत घेतले. २०२३ मध्ये संघ दुसऱ्या विजेतेपदासाठी दावा करेल. या संघाने शेवटच्या वेळी २००८ मध्ये पहिल्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावले होते. खरेदी केलेल्या नऊपैकी तीन विदेशी खेळाडू आहेत.