Rajasthan Royals win over Punjab Kings by 3 wickets : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २७ वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुल्लानपूर येथे खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर ३ विकेट्सनी निसटता विजय मिळवला. पंजाब किंग्जने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने शिमरॉन हेटमायरच्या शानदार खेळीच्या जोरावर १९.५ षटकांत ७ गडी गमावून १५२ धावा करत पाचवा विजय नोंदवला.

राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य होते. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने संथ सुरुवात करूनही १९.५ षटकांत ७ विकेट्स राखून लक्ष्य गाठले. राजस्थान रॉयल्सच्या विजयाचा हिरो ठरला शिमरॉन हेटमायर. या फलंदाजाने शेवटच्या षटकांमध्ये स्फोटक फलंदाजीचा नमुना सादर केला. शिमरॉन हेटमायर १० चेंडूत २७ धावा करून नाबाद परतला. या खेळीत त्याने १ चौकार आणि ३ षटकार मारले.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला

शिमरॉन हेटमायरने विजयी षटकार मारला –

राजस्थान रॉयल्ससाठी सलामीवीर यशस्वी जैस्वालने २८ चेंडूत सर्वाधिक ३९ धावा केल्या. तनुष कोटियनने ३१ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. या संघाचा कर्णधार संजू सॅमसनने १४ चेंडूत १८ धावा केल्या. तर ध्रुव जुरेल ११ चेंडूत ६ धावा करून हर्षल पटेलचा बळी ठरला. शेवटच्या षटकांमध्ये रोव्हमन पॉवेलने ५ चेंडूत ११ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मात्र, शेवटच्या षटकात १० धावांची गरज असताना शिमरॉन हेटमायरने चौथ्या चेंडूवर षटकार मारुन राजस्थानला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे राजस्थान रॉयल्सने मोसमातील पाचवा विजय नोंदवला. आता राजस्थान रॉयल्सचे ६ सामन्यांत १० गुण झाले आहेत. सध्या संजू सॅमसनचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पंजाब किंग्जसाठी कागिसो रबाडा आणि सॅम करन हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. या दोन्ही गोलंदाजांनी २-२ विकेट घेतल्या. याशिवाय अर्शदीप सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

हेही वाचा – IPL 2024 : युजवेंद्र चहलने नोंदवला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत झळकावले द्विशतक

तत्पूर्वी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाब संघाची सुरुवात विशेष झाली नाही. अथर्व तायडे आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात पहिल्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी झाली. आवेश खानने चौथ्या षटकात अथर्वला बाद केले. या सामन्यात तो शिखर धवनच्या जागी खेळताना दिसला. संघाला दुसरा धक्का युजवेंद्र चहलने ४१ धावांवर दिला. स्टार स्पिनरने प्रभसिमरन सिंगला (१०) बाद केले. यानंतर केशव महाराजांनी जॉनी बेअरस्टोला बाद केले. आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने पंजाबला तिसरा धक्का दिला. बेअरस्टो १५ धावा करून परतला.

हेही वाचा – Dipendra Singh Airee : ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत नेपाळच्या फलंदाजाने कतारच्या गोलंदाजाला फोडला घाम, पाहा VIDEO

सॅम करनने पाच आणि शशांक सिंगने नऊ धावा केल्या. चांगल्या फॉर्मात दिसणाऱ्या जितेश शर्माला आवेश खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २९ धावा करता आल्या. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन २१ धावा करून परतला. त्याला संजू सॅमसनने धावबाद केले. आशुतोष शर्मा डेथ ओव्हर्समध्ये पंजाबसाठी तारणहार ठरला. त्याने अवघ्या १६ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १९३.७५ च्या स्ट्राइक रेटने एक चौकार आणि तीन षटकार मारले. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने त्याला केशव महाराजकरवी झेलबाद केले.