संजू सॅमसन आणि शेन वॅटसन यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गड्यांनी पराभव केला. विजयासाठी बंगळुरूने ठेवलेले १७२ धावांचे आव्हान राजस्थानने १९.५ चेंडूंमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
राजस्थानच्या सॅमसनने ४१ चेंडूत ६३ धावा काढल्या, तर वॅटसनने ३१ चेंडूत ४१ धावा काढल्या. ब्रॅड हॉजने १८ चेंडूंमध्ये ३२ धावा काढून विजयाचा मार्ग सुकर केला. त्याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱया बंगळुरूच्या ख्रिस गेलने सर्वाधिक धावा काढून सगळ्यांचे लक्ष वेधले. त्याने १६ चेंडूत ३४ धावा काढल्या. कर्णधार विराट कोहलीने ३२ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. बंगळुरूच्या मोझेस हेनरिक्स आणि विनय कुमार यांनी प्रत्येकी २२ धावा काढून राजस्थानपुढे विजयासाठी १७२ धावांचे लक्ष ठेवले.
राजस्थानची बंगळुरूवर मात
संजू सॅमसन आणि शेन वॅटसन यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गड्यांनी पराभव केला.
First published on: 29-04-2013 at 07:39 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals beat royal challengers banglore by 4 wickets