संजू सॅमसन आणि शेन वॅटसन यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा चार गड्यांनी पराभव केला. विजयासाठी बंगळुरूने ठेवलेले १७२ धावांचे आव्हान राजस्थानने १९.५ चेंडूंमध्ये सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
राजस्थानच्या सॅमसनने ४१ चेंडूत ६३ धावा काढल्या, तर वॅटसनने ३१ चेंडूत ४१ धावा काढल्या. ब्रॅड हॉजने १८ चेंडूंमध्ये ३२ धावा काढून विजयाचा मार्ग सुकर केला. त्याआधी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱया बंगळुरूच्या ख्रिस गेलने सर्वाधिक धावा काढून सगळ्यांचे लक्ष वेधले. त्याने १६ चेंडूत ३४ धावा काढल्या. कर्णधार विराट कोहलीने ३२ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. बंगळुरूच्या मोझेस हेनरिक्स आणि विनय कुमार यांनी प्रत्येकी २२ धावा काढून राजस्थानपुढे विजयासाठी १७२ धावांचे लक्ष ठेवले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा