Sanjeev Goenka on KL Rahul : लखनऊ सुपर जायंट्सच्या खराब कामगिरीमुळे केएल राहुलला संघमालक संजीव गोयंकाच्या सामोरे जावे लागले आहे. आयपीएलमध्ये असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी न्यूझीलंडचा महान खेळाडू रॉस टेलरलाही फ्रँचायझी मालकाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. ही घटना आयपीएल २०११ मधील आहे, ज्यात एका फ्रँचायझी मालकाने महान फलंदाज रॉस टेलरवर हात उचलला होता. माजी खेळाडूने ‘रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट’ या त्याच्या आत्मचरित्रात याचा खुलासा केला आहे.
रॉस टेलरच्या ‘रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट’ या आत्मचरित्रानुसार मोहालीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्यावर हात उचलण्यात आला होता. या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. तथापि, टेलरने त्याच्याशी भांडण करणाऱ्या फ्रेंचायझी मालकाचे नाव उघड केले नाही.
रॉस टेलरने आत्मचरित्रात काय लिहिले आहे?
टेलरने लिहिले, “आम्हाला १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. त्यावेळी मी शून्यावर आऊट झालो आणि आम्ही जवळ जाऊ शकलो नाही. यानंतर टीम, सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापन हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील बारमध्ये होते. लिझ हर्ले शेन वॉर्नसोबत तिथे होती. त्यावेळी राजस्थान रॉयल्सचा एक मालक मला म्हणाला, ‘रॉस आम्ही तुला डकवर आऊट होण्यासाठी एक लाख डॉलर्स दिले नाहीत’ आणि त्याने मला तीन किंवा चार कानशिलात लगावल्या. यानंतर तो हंसत होता. भलेही त्या कानशिलात जोरात लगावण्यात आल्या नव्हत्या, पण मला खात्री नाही की ते पूर्णपणे नाटक होते. मला याचा मुद्दा बनवायचा नाही, परंतु अनेक व्यावसायिक क्रीडा वातावरणात असे घडण्याची मी कल्पना करू शकत नाही.”
हेही वाचा – PBKS vs RCB : कगिसो रबाडाच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने मारली अचानक एन्ट्री, VIDEO होतोय व्हायरल
रॉस टेलरची कारकीर्द –
आयपीएल २०११ मध्ये, रॉस टेलरने राजस्थान रॉयल्ससाठी एकूण १२ सामने खेळले. यामध्ये त्याने ११९ च्या स्ट्राईक रेटने १८१ धावा केल्या. ही घटना उघडकीस आल्यानंतर राजस्थानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फ्रँचायझीने त्याला दहा लाख अमेरिकन डॉलर्समध्ये विकत घेतले होते. टेलरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ५५ सामने खेळले. यामध्ये त्याने १०१७ धावा केल्या. राजस्थान व्यतिरिक्त तो दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळला आहे.