Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad IPL Match Updates : आयपीएल २०२३ चा ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानात सुरु आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. कमालीचा फॉर्मात असलेल्या यशस्वी जैस्वालने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. जैस्वाल ३५ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन आणि जॉस बटलरने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थानने २० षटकात २ विकेट्स गमावत २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे सनरायझर्स हैद्राबादला विजयासाठी २१५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

राजस्थानसाठी सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलरने धडाकेबाज फलंदाजी केली. जैस्वालने १६ चेंडूत २ षटकार आणि ५ चौकार ठोकून ३५ धावा कुटल्या. मार्को जेनसेनच्या गोलंदाजीवर जैस्वाल झेलबाद झाला. त्यानंतर बटलरने हैद्राबादच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. बटलरने ५९ चेंडूत ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीनं ९५ धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. भुवनेश्वर कुमारने सटीक यॉर्कर टाकून बटलरला बाद केलं आणि राजस्थानला मोठा धक्का दिला. परंतु संजून सॅमसनने शेवटच्या षटकातही चौकार षटकारांचा पाऊस पाडला अन् राजस्थानची धावसंख्या दोनशे पार करण्यात यशस्वी ठरला. संजूने ३८ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीनं ६६ धावांची नाबाद खेळी केली.

Story img Loader