Rajasthan Royals vs Chennai Super Kings Match Update : राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा काल बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात ३ धावांनी पराभव केला. आयपीएलच्या १७ व्या सामन्यात चेन्नईविरोधात झालेल्या शानदार विजयानंतरही राजस्थान रॉयल्सला पेनल्टी लावण्यात आली. कर्णधार संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करून २० षटकात १७५ धावा केल्या. जोस बटलरने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आश्विन आणि हेटमायरने ३०-३० धावा केल्या. हा सामना खूप रोमांचक झाला. राजस्थानने चेन्नईचा अवघ्या तीन धावांनी पराभव केला. धोनीने १७ चेंडूत नाबाद ३२ धावांची खेळी साकारली. यामध्ये एक चौकार आण तीन षटकारांचा समावेश आहे. परंतु धोनीला सीएसकेला विजय मिळवून देण्यात अपयश आलं. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाला. धोनी स्ट्राईकवर होता आणि शेवटच्या चेंडूवर सीएसकेला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती.

नक्की वाचा – CSK vs RR: …म्हणून शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू शकलो नाही, एम एस धोनीनं सांगितलं त्यामागचं कारण

राजस्थान रॉयल्सला ठोठावला दंड, संजू सॅमसनलाही १२ लाखांचा भुर्दंड

एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या १७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला स्लो ओव्हर्स रेटनुसार दंड ठोठावण्यात आला. आयपीएलच्या या कोड ऑफ कंडक्टमध्ये राजस्थान रॉयल्स संघांची ही पहिली चूक होती. यामुळे संघाचा कर्णधार संजू सॅमसनवर १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. राजस्थान रॉयल्सचा यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत जबरदस्त प्रदर्शन राहिला आहे. आयपीएलच्या मागील हंगामातही राजस्थान रॉयल्सने चमकदार कामगिरी करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. आयपीएल २०२३ मध्येही राजस्थान रॉयल्सचं प्रदर्शन खूप चांगलं होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांपैकी राजस्थानने ३ सामन्यांत विजय मिळवला आहे.