Sanju Samson Press Conference, IPL 2023 : आयपीएल २०२३ चा ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानात अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात हैद्राबादने बाजी मारली. कारण याच षटकात हैद्राबादला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता असताना संदीप शर्माने नो बॉल फेकला आणि अब्दुल समदला जीवदान मिळालं. राजस्थानने दिलेलं २१५ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी हैद्राबादच्या फलंदाजांनी अथक प्रयत्न केले आणि २० षटकात ६ विकेट्स गमावून २१७ धावा करून राजस्थानचा पराभव केला. राजस्थानच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या संदीप शर्माच्या नो बॉलवर कर्णधार संजू सॅमसनने प्रतिक्रिया दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामना संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संजू म्हणाला, “सामना जिंकण्याच्या स्थितीत असताना तुम्ही रेषेच्या बाहेर जाऊन गोलंदाजी करू शकत नाही. समदला बाद केल्यानंतर संदीपने जल्लोष केला पण त्याने फेकलेला चेंडू नो बॉल निघाला आणि राजस्थानला पराभवाला सामोरं जावं लागलं. समदने जीवदान मिळाल्यानंतर षटकार ठोकून हैद्राबादला विजय मिळवून दिला. आयपीएलमध्ये अशा प्रकारचे रंगतदार सामने होतात. अशा सामन्यांमुळे आयपीएल आणखी स्पेशल बनते. सामना जिंकला आहे, असं तुम्ही आधीच ठरवू शकत नाही.”

नक्की वाचा – RR vs SRH, IPL 2023 : अटीतटीच्या सामन्यात अखेर हैद्राबादने मारली बाजी, संदीप शर्माची ‘ती’ चूक राजस्थानला भोवली

“मला माहित होतं की, एखादा विरोधी खेळाडू त्याच्या संघाला सामना जिंकवू शकतो आणि ते चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होते. पण मला संदीप शर्मावर आत्मविश्वास होता. सीएसकेविरोधात झालेल्या अशाच एका सामन्यात त्याने राजस्थानला विजय मिळवून दिला होता. नो बॉल फेकल्यानंतर तुम्हाला दुसरा चेंडू टाकावा लागतो. हे खूप सोपं गणित आहे. याबद्दल फार काही विचार करण्याची आवश्यकता नसते,”असंही संजू म्हणाला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals skipper sanju samson gives big statement on sandeep sharmas no ball srh beats rr ipl 2023 nss
Show comments