Rajasthan Royals vs Lucknow Super Giants IPL Match Updates : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा २६ वा सामना रंगतदार झाला. राजस्थानने नाणेफेक जिंकू प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या लखनऊ सुपर जायंट्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १५४ धावांपर्यंत मजल मारली. विजयसाठी १५५ धावांचा पाठलाग करण्यासाठी लखनऊच्या सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलरने आक्रमक खेळी केली. जैस्वालने ३५ चेंडूत ४४ धावांची खेळी साकारली. तर जॉस बटलरने ३९ चेंडूत ३९ धावांची सावध खेळी करत राजस्थानला विजयाच्या दिशेनं नेलं. परंतु, लखनऊच्या भेदक माऱ्यापुढं राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि लखनऊचा या सामन्यात दणदणीत विजय झाला. राजस्थानने २० षटकात ७ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या. त्यामुळे लखनऊने या सामन्यात बाजी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखनऊसाठी मार्कस स्टॉयनिसने दोन विकेट्स घेत राजस्थानला मोठा धक्का दिला. खेळपट्टीवर सेट झालेल्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बाद करण्यात स्टॉयनिसला यश आलं. तसंच आवेश खानने मोक्याच्या क्षणी धडाकेबाज फलंदाज शिमरन हेटमायरला फक्त २ धावांवर बाद केलं. त्यानंतर राजस्थानच्या संघावर दबाव आल्याने धावांची गती मंदावली होती. आवेश खानने ३ विकेट घेतल्या तर मार्कस स्टॉयनिसने २ विकेट घेत राजस्थानच्या विजयाच्या आशा मावळल्या.

राजस्थानचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने के एल राहुलला बाद करत लखनऊला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर ट्रेंट बोल्टने आयुष बडोनीला अवघ्या एका धावेवर बाद करून लखनऊच्या संघाला दबावात टाकलं. परंतु, केली मायर्सने आक्रमक खेळी करत लखनऊचा डाव सावरला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये तिसरं अर्धशतक ठोकलं. मात्र, धावांसाठी संघर्ष करणारा दीपक हुड्डा आश्विनच्या गोलंदाजीचा शिकार झाला.

हुड्डा फक्त २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर केली मायर्स आक्रमक अंदाजात फलंदाजी करत असताना आश्विनने भेदक मारा करत मायर्सला ५१ धावांवर क्वीन बोल्ड केलं. त्यानंतर मार्कस स्टॉयनिस आणि निकोलस पुरनने लखनऊच्या संघाची कमान सांभाळली. राजस्थान रॉयल्ससाठी आर आश्विनने दोन विकेट्स घेतल्या. जेसन होल्डर आणि ट्रेंट बोल्टला प्रत्येकी एक विकेट मिळाली. तर संदीप शर्माने मार्क स्टॉयनिसला २१ धावांवर बाद केलं. तसंच निकोलस पुरनला संजू सॅमसनने २९ धावांवर धावबाद केलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals wins against lucknow super giants avesh khan takes 3 wickets and marcus stoinis 2 wickets helps lucknow to win this match nss