Rajat Patidar Ruled Out IPL 2023: आयपीएलच्या १६व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा फलंदाज रजत पाटीदार आता दुखापतीमुळे आयपीएल २०२३ च्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. पाटीदारचा बाहेर पडणे हा बंगळुरू संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण गेल्या मोसमात त्याने आपल्या फलंदाजीने संघासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केलेल्या ट्विटमध्ये सांगितले की, टाचेच्या दुखापतीमुळे रजत पाटीदार या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. त्यांनी पुढे लिहिले की, दुर्दैवाने रजत पाटीदार दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. तो लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. या काळात त्याला फ्रँचायझीकडून पूर्ण पाठिंबा दिला जाईल. प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे की, सध्या आम्ही रजतच्या बदली खेळाडूचे नाव जाहीर करणार नाही.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Anuj Rawat leave Delhi Team and join Gujarat Titans camp ahead IPL 2025 season
Anuj Rawat : आयपीएलला प्राधान्य देणे ‘या’ खेळाडूला पडणार महागात, गुजरात टायटन्ससाठी रणजी संघाची सोडली साथ
Kho-Kho World Cup Delhi, Kho-Kho ,
विश्लेषण : दिल्लीत चक्क खो-खो विश्वचषक? किती संघ सहभागी? स्पर्धेमुळे या मराठमोळ्या खेळाला संजीवनी मिळेल?
youth of Nashik came to Aheri and raped minor girl after friendship through online gaming called Free Fire
गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?

प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला आशा होती की मध्य प्रदेशातील २९ वर्षीय फलंदाज आयपीएल २०२३ मध्ये खेळण्यासाठी उपलब्ध होईल. परंतु आता त्याला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल २०२२ मध्ये रजत पाटीदार बदली खेळाडू म्हणून संघात सामील झाला होता. त्याने शानदार फलंदाजी करत १५० च्या स्ट्राईक रेटने ३३३ धावा केल्या. एलिमिनेटरमध्ये शतक झळकावून, तो आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला होता. यानंतर, त्याचा देशांतर्गत हंगामही चांगला गेला.

रजत पाटीदारच्या जागी फ्रँचायझीने अद्याप घोषणा केलेली नाही. संघाचा पुढील सामना ६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आहे. फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघ खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड देखील दुखापतग्रस्त असून तो अद्याप भारतात आलेला नाही. मुंबई इंडियन्सविरुद्ध रीस टोपली जखमी झाला होता.

हेही वाचा – IPL 2023: विराट कोहलीने लिहिली फक्त ‘या’ ८ शब्दांवर कविता, जी तुम्हालाही करेल प्रेरित; पाहा VIDEO

जर आपण रजत पाटीदारच्या आयपीएल रेकॉर्डवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४०.४ च्या सरासरीने एकूण ४०४ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

Story img Loader