भारतात सुरू असलेल्या आयपीएलची जगभरात चर्चा असते. जगभरातील विविध खेळाडू या स्पर्धेत सामील होतात. आयपीएलप्रमाणे पाकिस्तानात देखील पाकिस्तान सुपर लीग खेळवली जाते. यंदा तर पीएसएलचे आयोजन आयपीएलदरम्यान केले जाते. दरम्यान तेथील काही व्हीडिओ सातत्याने व्हायरल होत असतात. पण पाकिस्तानचे माजी खेळाडू रमीझ राजा यांनी तर मोठा घोळ घातला.
पीएसएलच्या सामन्यानंतर होणाऱ्या प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी अशी चूक केली की त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आहे. सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. पीएसएलमध्ये असूनही त्यांनी आयपीएलचा उल्लेख केला.
एकीकडे, भारत आयपीएलमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे, पाकिस्तानमधील चाहते पीएसएलचा आनंद घेत आहेत. या लीगमध्ये रमीझ राजा यांनी सामन्यानंतर अँकरची भूमिका पार पाडताना मोठी चूक केली. मुलतान सुल्तान्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील सामन्याच्या सादरीकरण समारंभातील त्यांचा व्हीडिओ समोर आलाय.
रमीझ राजा यांची जीभ घसरली आणि त्यांनी पीएसएलऐवजी आयपीएल म्हटलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. मुलतान सुल्तान्स आणि लाहोर कलंदर्स यांच्यातील सामन्यात उत्कृष्ट झेल टिपल्याबद्दल जोश लिटिलला पुरस्कार देण्यात येत होता. दरम्यान त्यांनी त्याला बोलावत म्हणाले, काय उत्कृष्ट झेल होता. “हा आजचा सर्वाेत्कृष्ट कॅच होता, HBL IPL” असा उल्लेख त्यांनी केला.
HBL पाकिस्तान सुपर लीगचे टायटन स्पॉन्सर आहेत. रमीझ राजा यांनी HBL PSL ऐवजी HBL IPL असा उल्लेख केला. त्यांच्या या व्हीडिओवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.
पीएसएलच्या सुरुवातीला खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंचे व्हीडिओही व्हायरल झाले होते. विचित्र भेटवस्तूंचे व्हीडिओ व्हायरल होत होते. सादरीकरण समारंभात काही खेळाडूंना हेअर ड्रायर आणि काहींना स्कूटर वाटप करण्यात आले. सामनावीर खेळाडूला भेट म्हणून एक स्कूटर मिळाली. यावरूनही पीएसएलला ट्रोल करण्यात आलं.
तर पीएसएल सामन्यादरम्यानचे काही इतर व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. एका खेळाडूने सेलिब्रेशन करता करता त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला मुक्का मारला होता. तर पीएसएलमध्ये काही खेळाडू आयपीएल सामना ऑनलाईन पाहत होते. याशिवाय एक शिक्षिका तर स्टेडियममध्ये बसून पेपर तपासताना दिसली.