Rashid Khan and Alzari Joseph’s partnership: आयपीएल २०२३चा ५७ वा सामना शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरातचा २७ धावांनी पराभव केला. मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने दमदार शतक झळकावत मोलाचे योगदान दिले. त्याचबरोबर राशिद खानने गुजरात संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पण तो अपयशी ठरला. दरम्यान राशिद खानने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट ७९ धावांची खेळी खेळली आणि अल्झारी जोसेफसोबत भागीदारी करून विशेष कामगिरी केली.

राशिद खान आणि अल्झारी जोसेफ यांनी आयपीएलच्या इतिहासात ९व्या विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. राशिद आणि गुजरातच्या जोसेफ यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध ९व्या विकेटसाठी ८८* धावांची भागीदारी केली. याआधी हा विक्रम सीएसकेच्या सॅम करण आणि इम्रान ताहिर यांच्या नावावर होता, ज्यांनी ९व्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. या यादीत रविचंद्रन अश्विन आणि एमएस धोनीची जोडी तिसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेच्या धोनी-अश्विनने ४१ धावांची भागीदारी केली होती.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान

टी-२० क्रिकेटमध्ये ९व्या विकेटसाठी दुसरी सर्वोच्च भागीदारी –

तसे, राशिद खान आणि अल्झारी जोसेफ पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये ९व्या विकेटसाठी दुसरी सर्वोच्च भागीदारी केली आहे. पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये ९व्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम बेल्जियमच्या साबर जाखिल आणि सकलेन अलीच्या नावावर आहे. साबेर जाखील आणि सकलेन अली यांनी २०२२ मध्ये वॉटरलू येथे ऑस्ट्रियाविरुद्ध ९व्या विकेटसाठी नाबाद १३२* धावांची भागीदारी केली. राशिद आणि जोसेफ या जोडीने वेस्ट इंडिजच्या अकील हुसेन-रोमारियो शेफर्ड आणि पार्टेक्स स्पोर्टिंग क्लबच्या इशरुल इस्लाम आणि जैनुल इस्लाम या जोडीला मागे टाकले आहे.

हेही वाचा – Suyash Sharma: ‘मी पहाटे ३ ते ६ वाजेपर्यंत रडलो होतो…’; केकेआरच्या स्टार खेळाडूने संघर्षाच्या दिवसांबद्दल केला खुलासा

पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये ९व्या विकेटसाठी तिसरी सर्वोच्च भागीदारी पार्टेक्स स्पोर्टिंग क्लबच्या इशरुल इस्लाम आणि जैनुल इस्लाम यांच्यात होती. या दोघांनी २०२१ मध्ये सावर येथे एल रूपगंज विरुद्ध ७३धावांची नाबाद भागीदारी केली होती. वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन आणि रोमॅरियो शेफर्ड ही जोडी या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या जोडीने २०२२ मध्ये बार्बाडोस येथे इंग्लंडविरुद्ध ९व्या विकेटसाठी नाबाद ७२ धावांची भागीदारी केली होती.

हेही वाचा – Rajasthan Royals: युजवेंद्र चहलचा ऐतिहासिक कामगिरीनिमित्त राजस्थानच्या ड्रेसिंग रूममध्ये खास सन्मान, पाहा VIDEO

सामन्याबद्दल बोलायचे, तर गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला २० षटकांत ८ गडी गमावून १९१ धावा करता आल्या. राशिद खानने अवघ्या ३२ चेंडूंत तीन चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावा केल्या.

Story img Loader