Rashid Khan breaks Mohammed Shami’s record : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद आयपीएलच्या १७व्या हंगामातील १२वा सामना खेळला गेला. या सामन्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने सनरायझ्रर्स हैदराबाद ७ विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने गुजरातसमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने ३ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान या सामन्यात राशिद खानने मोहम्मद शमीचा विक्रम मोडत गुजरातसाठी इतिहास रचला आहे.
राशिद खान हा पराक्रम करणारा गुजरातचा पहिला गोलंदाज –
राशिद खानने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चमकदार कामगिरी केली. त्याने चार षटकात ३३ धावा देत १ विकेट घेतली. यासह तो गुजरात टायटन्ससाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. राशिद गुजरात टायटन्सकडून आतापर्यंत ३६ आयपीएल सामन्यात ४९ विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद शमी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ४८ विकेट्स आहेत. मोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर ३१ विकेट्स आहेत.
गुजरात टायटन्ससाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
राशिद खान- ४९ विकेट्स
मोहम्मद शमी- ४८ विकेट्स
मोहित शर्मा – ३१ विकेट्स
हेही वाचा – GT vs SRH : साई-मोहितच्या जोरावर गुजरातचा शानदार विजय, हैदराबादला ७ विकेट्सनी चारली धूळ
सामन्याबद्दल बोलायचे, तर गुजरात टायटन्सने १६३ धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. डेव्हिड मिलरने १९१. षटकांत षटकार ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्याने २०व्या षटकात जयदेव उनाडकटच्या पहिल्या चेंडूवर त्याने लाँग ऑफवर गगनचुंबी षटकार मारला. गुजरातकडून साई सुदर्शनने ४५ आणि डेव्हिड मिलरने नाबाद ४४ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. अजमतुल्ला ओमरझाईच्या चेंडूवर १७ चेंडूत १६ धावा करून मयंक अग्रवाल बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेडला नूर अहमदने क्लीन बोल्ड केले. त्याला १४ चेंडूत १९ धावा करता आल्या. अभिषेक शर्माला मोहित शर्माने शुबमनच्या हाती झेलबाद केले. आपल्या खेळीत त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. एडन मार्करम १९ चेंडूत १७ धावा करून बाद झाला, तर हेनरिक क्लासेन १३ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. हैदराबादने २० षटकांत ८ गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.