Rashid Khan register first hat-trick in IPL 2023: आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात उत्साहाची पातळी दिसली जी क्वचितच कोणत्याही सामन्यात दिसून येते. कारण या सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात प्रत्येक क्षणी बदलताना दिसत होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने केकेआरला २०५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात केकेआरने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ते पाहता लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण वाटत होते. परंतु व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांच्या शतकी भागीदारीनंतर रिंकू सिंगने वादळी खेळी साकारत केकेआरला विजय मिळवून दिला. या सामन्यात राशिद खानच्या हॅट्ट्रिकने घेतली.

राशीदच्या हॅट्ट्रिकने केकेआरला दिला होता झटका –

केकेआरविरुद्धच्या सामन्यात राशिद खान गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. त्याने आयपीएल २०२३ ची पहिली हॅट्ट्रिक आपल्या नावावर केली. रशीदने डावाच्या १९व्या षटकात ३ फलंदाजांना बाद करत ही हॅट्ट्रिक साधली. राशीदच्या हॅट्ट्रिकने गुजरातला पूर्णपणे सामन्यात परत आणले, परंतु रिंकू सिंगच्या शेवटच्या षटकाचा खेळ गुजरात संघ कधीही विसरणार नाही. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात ५ षटकार मारत गुजरातच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.

हेही वाचा – Rinku Singh: कोलकात्याला अशक्यप्राय विजय मिळवून देणारा रिंकू सिंग आहे कोण? घ्या जाणून

राशिदने टी-२० क्रिकेटमध्ये ४ हॅटट्रिक नोंदवल्या –

राशिद खानच्या हॅट्ट्रिकने रिंकू सिंगच्या धडाकेबाज प्रदर्शनापूर्वी सामना आपल्या दिशने वळवला होता. केकेआरच्या डावातील १९व्या षटकात रशीद खानने आंद्रे रसेलला (१) प्रथम बाद केले. त्यानंतर रशीदने सुनील नरेन (०) आणि शार्दुल ठाकूर (०) यांची विकेट घेत आयपीएल २०२३ ची पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. यासह राशिद खान टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक करणारा गोलंदाज ठरला आहे. यासह राशिद खानच्या नावावर टी-२० इंटरनॅशनल, आयपीएल, बिग बॅश लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये हॅट्ट्रिक नोंदवली गेली आहे.

राशिदने ५ खेळाडूंना मागे सोडले –

आयपीएल २०२३ ची पहिली हॅट्ट्रिक घेतल्यानंतर राशिदने टी-२० क्रिकेटमध्ये चौथी हॅट्ट्रिक घेतली. यासह राशिदने टी-२० क्रिकेटमध्ये ३-३ हॅटट्रिक नोंदवणाऱ्या ५ गोलंदाजांना मागे टाकले. राशिदने मागे सोडलेल्या खेळाडूंमध्ये अँड्र्यू टाय, मोहम्मद शमी, अमित मिश्रा, आंद्रे रसेल आणि इम्रान ताहिर यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये ३-३ हॅटट्रिक आहेत. आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणारा राशिद खान हा तिसरा कर्णधार ठरला आहे. त्याच्या आधी युवराज सिंगने २००९ मध्ये दोनदा आणि शेन वॉटसनने २०१४ मध्ये एकदा हॅटट्रिक घेतली होती.

Story img Loader