Rashid Khan Makes New World Record, IPL 2023 : मुंबई इंडियन्सविरोधात राशिद खानने फिरकीचा जलवा दाखवून ४ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आणि टी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम नोंदवला. राशिद टी-२० क्रिकेटमध्ये ५५० विकेट्स घेणारा जगातील पहिला फिरकीपटू बनला आहे. राशिदने आतापर्यंत टी-२० मध्ये एकूण ५५१ विकेट घेण्याची कमाल केली आहे. याशिवाय राशिदने टी-२० करिअरमधील सर्वात मोठा वैयक्तित स्कोअर केला आहे. राशिदने मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात फक्त ३२ चेंडूत ७९ धावांची नाबाद खेळी केली. राशिदचा आयपीएलमधील हा पहिला अर्धशतक आहेच, परंतु, टी-२० क्रिकेटमध्ये अफगानिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूचा सर्वात मोठा स्कोअर आहे. राशिदने या इनिंगमध्ये १० षटकार आणि ३ चौकार ठोकले. टी-२० क्रिकेटमध्ये ८ व्या नंबरवर फलंदाजी करून सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रमही राशिदच्या नावावर नोंदवला गेला आहे.

याशिवाय राशिद आयपीएलच्या इतिहासात नंबर ८ वर फलंदाजी करून सर्वात मोठी इनिंग खेळणारा फलंदाजही बनला आहे. राशिदने अशी कामगिरी करून पॅट कमिन्सला मागे टाकलं आहे. कमिन्सने २०२१ मध्ये ८ व्या नंबरवर फलंदाजी करून ६६ धावांची खेळी केली होती. तर हरभजन सिंगने २०१५ च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरोधात ८ व्या नंबरवर फलंदाजी करून ६४ धावा कुटल्या होत्या.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
kharmas 2024 horoscope surya gochar 2024 in marathi
Kharmas 2024: १५ डिसेंबरपासून ‘या’ चार राशींवर मिळेल बक्कळ पैसा! खरमास सुरू होताच सूर्यदेवाच्या आशीर्वादाने धनलाभाची संधी
Gajakesari Raja Yoga
१३ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींना मिळणार भरपूर पैसा; गजकेसरी राजयोगाच्या प्रभावाने आयुष्यात येणार धनसंपत्तीचे सुख

नक्की वाचा – गुजरात टायटन्स हरली पण राशिद खान जिंकला! एकट्या टायगरने वानखेडे मैदानात ठोकले १० गगनचुंबी षटकार, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

याशिवाय राशिद आयपीएलमध्ये पराभव झालेल्या सामन्यात चार विकेट आणि अर्धशतकी खेळी करणारा तिसरा खेळाडू बनला आहे. युवराज सिंग (२०११ आणि २०१४) आणि मिचेल मार्श (२०२३) यांनी हारलेल्या सामन्यात गोलंदाजी करून ४ विकेट्स घेऊन फलंदाजी करताना अर्धशतक ठोकलं होतं. या सामन्यात राशिदने भेदक गोलंदाजी करून चार विकेट्स घेतल्या आणि या हंगामात तो परपक कॅपवर अधिकार गाजवण्यात यशस्वी झाला आहे. राशिदने १२ सामन्यात एकूण २३ विकेट घेतले आहेत. मुंबईने गुजरातला २१९ धावांचं आव्हान दिलं होतं. पंरतु, गुजरात टायटन्सला २० षटकात १९१ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा या सामन्यात विजय झाला.

Story img Loader