Rashid Khan Makes New World Record, IPL 2023 : मुंबई इंडियन्सविरोधात राशिद खानने फिरकीचा जलवा दाखवून ४ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आणि टी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम नोंदवला. राशिद टी-२० क्रिकेटमध्ये ५५० विकेट्स घेणारा जगातील पहिला फिरकीपटू बनला आहे. राशिदने आतापर्यंत टी-२० मध्ये एकूण ५५१ विकेट घेण्याची कमाल केली आहे. याशिवाय राशिदने टी-२० करिअरमधील सर्वात मोठा वैयक्तित स्कोअर केला आहे. राशिदने मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात फक्त ३२ चेंडूत ७९ धावांची नाबाद खेळी केली. राशिदचा आयपीएलमधील हा पहिला अर्धशतक आहेच, परंतु, टी-२० क्रिकेटमध्ये अफगानिस्तानच्या या अष्टपैलू खेळाडूचा सर्वात मोठा स्कोअर आहे. राशिदने या इनिंगमध्ये १० षटकार आणि ३ चौकार ठोकले. टी-२० क्रिकेटमध्ये ८ व्या नंबरवर फलंदाजी करून सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रमही राशिदच्या नावावर नोंदवला गेला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा